धाराशिव लाइव्हचा दणका :   प्रेम शिंदे संशयास्पद मृत्यू  प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग 

ढोकी पोलीस ठरले निष्क्रिय  : सपोनि राऊत यांना निलंबित करण्याची मागणी 
 
s

 धाराशिव - तालुक्यातील वाणेवाडी येथील एका अध्यात्मिक निवासी शाळेत दहावीत शिकणाऱ्या प्रेम लहू शिंदे ( वय १४ ) याचा  दि.५ ऑगस्ट रोजी संशयास्पद मृत्यू झाला असून,  याप्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली असली तरी मुख्य आरोपी काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे यास पोलिसांनी अकरा दिवस झाले तरी अटक केलेली नाही. धाराशिव लाइव्हने या प्रकरणाची मालिका प्रसिद्ध केल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना अखेर जाग आली असून , या प्रकरणाचा तपास ढोकी पोलिसांकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. 

वाणेवाडी येथे श्रद्धेचा बाजार मांडून लोकांकडून देणग्या गोळा करणाऱ्या काका उंबरे आणि त्याच्या पंटरनी प्रेम शिंदे ( वय १४ रा. वाखरवाडी ) या   गरीब विद्यार्थांचा बळी घेतला.  प्रेम शिंदे यास  काका उंबरे आणि त्याच्या पंटरनी प्रेम शिंदे यास  बेदम मारहाण केली आणि त्याचा मृत्यू  झाल्यानंतर आत्महत्येचा बनाव केला. ढोकी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल न करता , आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल  केला. इतकेच काय तर मुख्य आरोपी  काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे  यांना अटक न करता पळून जाण्यास मदत केली. 

हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी काका उंबरे  याचा मावस भाऊ जो स्वतःला स्टार पत्रकार समजतो त्याने पोलीस खात्यावर दबाव आणला. त्यामुळे अकरा  दिवस झाले तरी पोलिसांनी  मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या नाहीत. धाराशिव लाइव्हने या प्रकरणाच्या सर्व बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत, तसेच काल  दि. १४ ऑगस्ट रोजी  प्रेम शिंदे मृत्यू प्रकरण : उघडा डोळे, बघा नीट ... आरोपी आणि कुकर्मीचे संबंध काय ?   लिहून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या डोळ्यात अंजन घातले होते. 

धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास ढोकी पोलिसांकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. तशी पृष्टि ढोकी पोलीस स्टेशनचे सपोनि जगदीश राऊत यांनी दिली.आपले वडील आजारी असल्याने आपण सध्या छत्रपती संभाजीनगरला आलो असून, आता वाणेवाडीच्या प्रकरणाचा  तपास आपणाकडे नसून, एसपीनी  एलसीबीकडे सोपवल्याचे सांगितले. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, वाणेवाडीच्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी घेतला आहे हे सत्य आहे पण त्याची सर्व कागदपत्रे आपणाकडे अजून आली नसल्याचे सांगितले. 

ढोकी पोलिसाना निलंबित करा - सुभेदार 

वाणेवाडी येथे श्रद्धेचा बाजार मांडून लोकांकडून देणग्या गोळा करणाऱ्या काका उंबरे आणि त्याच्या पंटरनी प्रेम शिंदे ( वय १४ रा. वाखरवाडी ) या गरीब मराठा समाजातील विद्यार्थांचा बळी घेतला. या प्रकरणातील  मुख्य आरोपीना ढोकी पोलिसांनी जाणीवपूर्वक अटक केली नाही. त्यांना पळून जाण्यास मदत केली. ढोकी पोलीस निष्क्रिय ठरल्याने त्याचा तपास स्थानिक  गुन्हे शाखेकडे देण्याचा निर्णय झाला आहे. 

ढोकीचे निष्किय सपोनि जगदीश राऊत आणि पोलीस उपनिरीक्षक गाडे यांचे हात भ्रष्टाचारात बरबटले असून, दि. ४ ते ६ ऑगस्टचे सीसीटीव्ही तपासून, या दोघांना निलंबित करावे अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली आहे. 

माझ्या मुलाने काय गुन्हा केला ? 

e

प्रेम हा  माझा एकुलता एक मुलगा होता ,या जगात गरीबांचे कुणी कैवारी नाही का ?  गरीबाला न्याय नाही का ? आम्ही कोणाच  काय वाईट केले  म्हणून  ही आमच्यावर अशी वाईट वेळ आली. प्रेमने असा कोणता गुन्हा केला होता, त्याला एकाद्या जनावराप्रमाणे मारण्यात आले. भारत माझा देश आहे. सर्व भारतीय माझे बांधव माझे आहोत, असे आपण म्हणतो, पण तशी वागणूक काका उंबरे यांच्या  निवासी शाळेत मिळाली नाहीत. प्रेमची आत्महत्या नसून, त्याचा खून झाला आहे. पोलिसांनी योग्य तपास करून मला न्याय द्यावा 
- लहू शिंदे , वाखरवाडी ( मुलाचे पालक ) 

From around the web