उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये खर्रा खाऊन भिंती रंगवणाऱ्या वरिष्ठ सहाय्यकास शंभर रुपये दंड 

उस्मानाबाद लाइव्हचा दणका 
 
d

उस्मानाबाद - उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये कार्यालयीन वेळेत तंबाखू मिश्रित सुपारी ( खर्रा ) खाऊन कार्यालयाच्या भिंती रंगवणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक सचिन शामराज यास १०० रुपये दंड करण्यात आला आहे. उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर गट विकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने यांनी शामराज यांच्यावर ही कारवाई केली आहे. 

उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये काही कर्मचारी तंबाखू मिश्रित सुपारी ( खर्रा ) खाऊन कार्यालयाच्या भिंती रंगवत होते. कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक सचिन शामराज हे ऑफिसमध्ये खर्रा खात असल्याचा व्हिडीओ उस्मानाबाद लाइव्हने काही दिवसापूर्वी ( १८ मे  ) प्रसारित केला होता.

सार्वजनिक ठिकाणी अथवा शासकीय कार्यालयात तंबाखू, सुपारी, पान , पानमसाला , गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास / थुंकण्यास प्रतिबंध असताना सचिन शामराज हे ऑफिसमध्ये खर्रा खात असल्याचे निदर्शनास आले होते. उस्मानाबाद लाइव्हने शामराज हे ऑफिसमध्ये खर्रा खात असल्याचा व्हिडीओ प्रसारित केल्यानंतर गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी शामराज यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नोटीस मिळण्यापासून २४ तासाच्या आत खुलासा करावा , खुलासा समाधानकारक न वाटल्यास कारवाई करण्यात येईल, असे नमूद केले होते. मात्र वरिष्ठ सहाय्यक सचिन शामराज यांनी समाधानकारक खुलासा केला नाही. 

दरम्यान,  सचिन शामराज यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न  गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी केला असता, तसे वृत्तही उस्मानाबाद लाइव्हने प्रकाशित करताच, समृद्धी दिवाणे  यांची बदली झाली आणि नंदकिशोर शेरखाने यांनी गट विकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. शेरखाने यांनी उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये कार्यालयीन वेळेत  तंबाखू मिश्रित सुपारी ( खर्रा ) खाऊन कार्यालयाच्या भिंती रंगवणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक सचिन शामराज यास १०० रुपये दंड केला आहे. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयात पान , तंबाखू , गुटखा , खर्रा  खाणाऱ्या कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे. 

संबंधित बातमी 

उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये खर्रा खाऊन भिंती रंगवणाऱ्या कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस

From around the web