उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये खर्रा खाऊन भिंती रंगवणाऱ्या कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस 

 
s

उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये काही कर्मचारी तंबाखू मिश्रित सुपारी ( खर्रा ) खाऊन कार्यालयाच्या भिंती रंगवत होते. कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक सचिन शामराज हे ऑफिसमध्ये खर्रा खात असल्याचा व्हिडीओ उस्मानाबाद लाइव्हने काही दिवसापूर्वी प्रसारित केला होता. त्यानंतर गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी शामराज यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

d

सार्वजनिक ठिकाणी अथवा शासकीय कार्यालयात तंबाखू, सुपारी, पान , पानमसाला , गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास / थुंकण्यास प्रतिबंध असताना सचिन शामराज हे ऑफिसमध्ये खर्रा खात  असल्याचे निदर्शनास आले होते. उस्मानाबाद लाइव्हने शामराज हे ऑफिसमध्ये खर्रा खात असल्याचा व्हिडीओ प्रसारित केल्यानंतर गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी शामराज यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीस मिळण्यापासून २४ तासाच्या आत खुलासा करावा , खुलासा समाधानकारक न वाटल्यास कारवाई करण्यात येईल, असे नमूद केले आहे. 

d

या नोटीसीनंतर शासकीय कार्यालयात तंबाखू मिश्रित सुपारी ( खर्रा ) खाऊन भिंती रंगवणाऱ्या कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद पंचायत समितीसारखं मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये अनेक ऑफिसमध्ये काही कर्मचारी खर्रा खाऊन भिंती  रंगवत असल्याचे निदर्शनास आले आहे. 


 


 

From around the web