उस्मानाबाद जिल्ह्यात १६ एप्रिल रोजी ५८० पॉजिटीव्ह, २३ मृत्यू
Apr 16, 2021, 23:13 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज १६ एप्रिल ( शुक्रवार ) रोजी तब्बल ५८० जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर २९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात २३ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला तसेच आणखी ९ जणांचा मृत्यू झाला असून, हा मृत्यू सारीमुळे झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यू दर वाढल्याने घबराट पसरली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २८हजार ४२४ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २२ हजार ३८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६९० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५७१९ झाली आहे.
हे नक्की वाचा
कोरोनाने थैमान : जबाबदार कोण ?