ओली पार्टी करणाऱ्या नायब तहसीलदार राजाराम केलूरकर यांना कारणे दाखवा नोटीस 

उस्मानाबाद लाइव्हच्या वृत्ताची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून दखल 
 

उस्मानाबाद -  उस्मानाबादच्या सर्किट हाऊसमध्ये ओली पार्टी करणाऱ्या नायब तहसीलदार ( पुरवठा ) राजाराम केलूरकर यांना एक महिना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे , त्यानंतर आता जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी  केलूरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून २४ तासाच्या आत खुलासा करण्याचा आदेश दिला आहे. 

 उस्मानाबादच्या  सर्कीट हाऊसमध्ये बुधवार दि. ८ जून रोजी  रात्री नायब तहसीलदार ( पुरवठा ) राजाराम केलूरकर  यांनी  स्वस्त धान्य दुकानदारासोबत ओली पार्टी केली होती. एकीकडे उस्मानाबाद शहर आणि तालुक्यात गेले तीन महिने गहू , तांदूळ आणि साखर याचे वाटप नाही तर दुसरीकडे हे धान्य काळ्या बाजारात विकून आलेल्या पैश्यातून ओली पार्टी तेही चक्क सर्कीट हाऊसमध्ये केली जात होती. 

बुधवार दि. ८ जून रात्री 6 ते 12 पर्यंत ही ओली पार्टी सुरू होती, मटनावर ताव आणि प्यायला दारू यामुळे ही पार्टी चांगलीच रंगली होती,नायब तहसीलदार ( पुरवठा ) राजाराम केलूरकर आणि शहर आणि तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यावेळी उपस्थित होते, आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना दरमहा हप्ता पोहच करीत असल्याने आपले कुणी वाकडे करू शकत नाही, या गुर्मीत हा धिंगाणा सुरू होता.


उस्मानाबाद लाइव्हने याबाबत सर्वप्रथम वृत्त दिले होते. या वृत्ताची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  यांनी गंभीर दाखल घेऊन  नायब तहसीलदार ( पुरवठा ) केलूरकर  यांना कारणे दाखवा नोटीस बजावली  असून २४ तासाच्या आत खुलासा करण्याचा आदेश दिला आहे. 


उस्मानाबाद तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात गेल्या काही वर्षांपासून अनागोंदी कारभार सुरु असून शासकीय गहू, तांदूळ , साखर वाटत न करता , काळ्या बाजारात विक्री सुरु आहे. यात अनेक अधिकारी गुंतले आहेत.

संबंधित बातम्या 

उस्मानाबादच्या सर्किट हाऊसमध्ये तहसीलच्या बड्या अधिकाऱ्याची ओली पार्टी रंगली !

उस्मानाबाद लाइव्हचा दणका ! सर्किट हाऊसमध्ये झालेल्या ओली पार्टी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई