4 वर्षाचा वाघ कोरोनाचा शिकार

 
वाघांत प्रथमच आढळला कोरोना विषाणू

 4 वर्षाचा वाघ कोरोनाचा शिकार


कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून आता प्राणीमात्रासुद्धा वाचू शकलेले नाही आहेत.  ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयातील वाघ कोरोना विषाणूमुळे संसर्गित असल्याचे आढळले आहे. जेव्हा त्याच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती तेव्हा त्याची कोरोनासाठीची रक्त तपासणी केली गेली आणि तो वाघ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. अमेरिकन राष्टीय पशुवैद्यकीय सेवा कृषी विभागा  प्रयो शाळेने रविवारी दुपारी ही माहिती दिली .


वाइल्डलाइफ कन्सर्वेशन सोसायटीच्या ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की चार    वर्षाच्या असलेल्या नादीया नावाच्या वाघाला कोरोना व्हायरसचे संक्रमण एखाद्या माणसाच्या मार्फतच झाले आहे. ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालय 16 मार्च पासूनच जनतेसाठी बंद केले गेलेले होते. तसेच प्राणिसंग्रहालयात आणखी 5 वाघ तसेच सिंहाच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी घेतलेले आहेत ज्यांना श्वसनासंबंधीचे त्रास असल्याचे दिसत आहे. ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयात अनेक प्रकारचे प्राणी आहेत.


प्राण्यांचे अनुभवी डॉक्टर पॉल कॅली यांच्या म्हणण्यानुसार, मार्च महिन्याच्या उत्तरार्धात कोरड्या खोकला झाल्यामुळे नादिया या चार वर्षांच्या वाघाची कोरोना विषाणूची तपासणी 2 एप्रिल रोजी झाली. नादियाची बहीण दोन सायबेरियन वाघ आणि तीन आफ्रिकन सिंह यांनाही खोकला झाला होता आणि कमी भूक लागत होती. जेव्हा नादिया कोरोनाची लक्षणे दर्शवू लागली तेव्हा पशुवैद्यकीय पथकाने तिच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी घेतले.परंतु त्याचे निकाल अजून बाकी आहेत. प्राण्यांची रक्तचाचणी करणे पूर्णपणे भिन्न प्रकारचे काम असतात. हा नमुना कॉर्नेल विद्यापीठातील पशुवैद्यकीय निदान प्रयोगशाळेत पाठविला गेला.

मांजरसुद्धा कोरोनाने संक्रमित

यापूर्वी बेल्जियममध्ये मांजरीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग आढळला होता. या मांजरीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग तिच्या मालकिणीकडूनच आला होता. बेल्जियमच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाची खातरजमा केली आहे. बेल्जियमच्या व्हायरल डिसिसीज इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे प्रमुख स्टीव्हन यांनी या प्रकरणाची माहिती माध्यमांना दिली आहे. स्टीव्हनच्या म्हणण्यानुसार मांजरीच्या मालकिणीला एका आठवड्यापूर्वीच कोरोना विषाणूची लक्षणे दिसली होती व त्यानंतरच मांजरीलाही तिच्यामुळे विषाणूची लागण झाली.

From around the web