पौर्णिमेच्या चंद्राला पाहून लांडगे रडतात 

जाणून घ्या एक मजेशीर गोष्ट
 
पौर्णिमेच्या चंद्राला पाहून लांडगे रडतात

सुपर ब्लड वूल्फ मून म्हणजे नव्या वर्षातील पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येतो. त्या पहिल्या पौर्णिमेला वुल्फ मून असे नामकरण झाल्याचे आढऴते. ह्यावर्षी चंद्र पृथ्वीपासून तीन लाख 63 हजार किमीच्या अंतरावर म्हणजेच प्रथमच एवढ्या कमी अंतरावर दिसणार आहे  आणि याच कारणामुळे चंद्राचा रंगही पृथ्वीवरून अधिक गडद असा लालसर दिसणार आहे.

 केवळ याच मजेशीर कारणामुळे लांडगे -वूल्फ लालचंद्राला पाहून घाबरतात.

जानेवारीतील पोर्णिमेला वूल्फ मून हे नाव ठेवण्याचे मुख्य कारण असे की, अगदी पुरातन काळापासून जानेवारी महिन्याच्या सुमारास कडाक्याच्या थंडीच्या दिवसांत या दिवशी चंद्राचे लालभडक दर्शन होई व ते नेहमीपेक्षा निराळे असल्याने लांडगे जोरजोरात ओरडत असत. इतर दिवसांच्यापेक्ष्या पोर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने चंद्रबिंब अधिक मोठे व काही अंशी अधिक प्रकाशमान दिसून येणार आहे. या पोर्णिमेवेळी चंद्राच्या दिसणाऱ्या लालबिंबामुळे त्याला ब्लडमून असेही संबोधले जाते.

लांडगे आपला भक्ष्य शोधण्यासाठी हिंडत असतात, पौर्णिमेच्या दिवशी रात्री जेव्हा हे लांडगे भूक लागल्यावर शिकार शोधायला बाहेर फिरतात तेव्हा आकाशातील लाल चंद्रबिंबाला पाहून मोठमोठ्याने आवाज करू लागतात, ओरडू लागतात. 

From around the web