शेफने तयार केला 'कोरोना बर्गर' ...

 
जो विषाणू आपल्याला घाबरवतोय त्यालाच आता खा !

शेफने तयार केला 'कोरोना बर्गर' ...

संपूर्ण जगच कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे घाबरत आहे त्यातच एक व्यक्ती लोकांना हा विषाणू खाण्यास सांगत आहे. अहो मंडळीघाबरून जाण्याची काही गरज नाहीहा विषाणू काही शरीरात संसर्ग करणार नाही परंतु याऊलट तुमच्या तोंडाची चवच वाढवेल. वास्तविकव्हिएतनामची राजधानी असलेल्या हनोई येथील एका शेफने एका विशिष्ट प्रकारचे बर्गर बनविलेले आहेत व त्याने त्याचे नावच मुळी कोरोना बर्गर असे ठेवले आहे.

हा हिरवा रंग असलेला आणि विचित्र दिसणारा बर्गर (कोरोना बर्गर) लोकांना खूपच आवडलेला आहे.  शेफ हॉंग तुंग म्हणतात की ,  आपल्याला जर एखाद्या गोष्टीला पराभूत करायचे असेल तर ते खा. म्हणूनच तो शेफ लोकांचे मनोबल वाढविण्यासाठी कोरोना व्हायरस ही थीम असलेला व हिरव्या भाजीने समृद्ध असलेला बर्गर विकत आहे.   हा बर्गर  कोरोना  व्हायरससारखा दिसण्यासाठी शेफ त्यात पिठाने वरील भागावर काटयासारखा ,स्पाईक्सचा   आकार बनवत आहे.

शेफने तयार केला 'कोरोना बर्गर' ...

शेफ तुंग हा पिझ्झा होम टेकअवेचे काम करतो,  परंतु सध्या लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद आहे म्हणून त्याने एक अनोखा बर्गर बनवण्याची योजना आखली होती, अशाप्रकारे विचार केल्याने साथीच्या काळात इतरांना असा बर्गर खाऊ घालूनही आनंद देता येऊ शकेल. असे त्याला वाटले. शेफने असेही नमूद केले की तो दररोज सुमारे 50 कोरोनाबर्गरची विक्री करतो.

From around the web