दोन बायका फजिती ऐका ... लॉकडाऊनमुळे त्याची झाली मोठी गोची...

 

 दोन बायका फजिती ऐका ... लॉकडाऊनमुळे त्याची झाली मोठी गोची...


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगातील अनेक देशांनी  सर्व व्यवहार लॉकडाऊन केले आहेत. एखाद्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळला तर तो भाग सीलबंद केला जात आहेत, यामुळे लोक घरात अडकून पडले आहेत. घरात अडकून पडल्यामुळे अनेक समस्या तयार झाल्या आहेत. कोणाची काय समस्या तर  कोणाची काय ? पण एका व्यक्तीची समस्या ऐकून तुम्ही चकितच नाही तर गालातल्या गालात नक्की हसाल. 

सौदी अरेबिया देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन आहे. सौदीतील लोकांना घर सोडण्यापूर्वी पोलिसांकडून दरवेळी परवानगी घ्यावी लागते. पोलिसांना एका व्यक्तीचा फोन आला आणि तो  आपल्या दुसऱ्या  पत्नींना भेटायला परवानगी मिळविण्याच्या प्रयत्नात होता.दुबई पोलिसांच्या वाहतूक विभागाचे संचालक ब्रिगेडियर सैफ मुहैर यांना एका व्यक्तीने फोन करून विचारले की, मला आता एका पत्नीकडून दुसऱ्या पत्नीकडे जाण्यासाठी तुमच्या परवानगीची आवश्यकता आहे का? त्यावर वाहतूक विभागाचे संचालक ब्रिगेडियर सैफ मुहैर चांगलेच चकित झाले.  

दुबईमध्ये लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडण्यावर कडक बंदी आहे. येथे लोक आपले घर केवळ अत्यंत महत्त्वाच्या कामासाठीच सोडू शकतात. त्यासाठी लोकांना रहदारी कक्षात फोन करून आधी परवानगी घ्यावी लागते. डायरेक्टरने सांगितले की, त्याला वेगवेगळ्या कारणांसाठी परवानग्या आवश्यक असणारे कॉल येत असतातत पण हा कॉल पूर्णपणे अगदी वेगळाच होता.

त्या व्यक्तीला अजून तरी पोलिसांनी परवानगी दिली नाही. यालाच म्हणतात, दोन बायका फजिती ऐका ... 

From around the web