उत्तर प्रदेशात मध्यरात्री लोक झोपेत दगड होऊ लागले ...
Wed, 25 Mar 2020
व्हायरल चेक
नवी दिल्ली - एकीकडे कोरोना व्हायरसचा कहर माजलाय तर दुसरीकडे सोशल मीडियावर अनेक फेक न्यूज आणि अफवा सुरूच आहेत किंबहुना प्रत्यक्षातही अफवांना उधाण आल्याचे पहायला मिळत आहे. या संदर्भात , उत्तर प्रदेशच्या बिजनौर आणि अलिगडमध्ये अचानक मध्यरात्रीच्या झोपेच्या वेळी लोक दगड झाल्याची अफवा पसर ली होती. लोकांना सांगितले गेले की, जो झोपतो तो कायमचाच झोपला जाईल, मेल्यात जमा होईल. मग असे ऐकल्यावर अनेक मध्यरात्री लोक जागे होऊ लागले आणि ते आपापल्या घरातून बाहेर पडू लागले.
इतकेच नाही तर, परिसरात अशी काही अफवा पसर व ली आणि सांगण्यात आले, की आता गाव उलथून गेलेय कारण पुढे मोठा भूकंप होणार आहे. अशा गोष्टी ऐकून लोक खूपच घाबरून गेले होते . कारण आधीच कोरोनामुळे लोक घाबरून गेले आहेत त्यातच अशा परिस्थितीत या विविध अफवांमुळे लोकांची झोपच उडायची वेळ आली आहे . अशा अफवांमुळे बरेच लोक रात्रभर जागे रहातात आणि काहीतर रात्रभर भीतीपोटी चालत असतात. हळूहळू अशा विचित्र अफवा बुलंदशहर , बागपत, हापूर, शामली अशा विविध शहरांमध्ये पसरताना दिसत आहे.
दरम्यान, ही अफवांची बातमी जसजशी पसरत गेली तसतसे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना आदेश द्यावे लागले आणि कायदा हातात घ्यावा लागला. तसेच या अफवांच्या संदर्भात आठ लोकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत देशात कोरोना विषाणूची 500 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदविली गेली आहेत. या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. त्यात अफवांचे नवनवीन पेव फूटत आहेत.