अबब !  येथे मिळतो चक्क सोन्याचा बर्गर... 

 
अबब !  येथे मिळतो चक्क सोन्याचा बर्गर...

आबालवृद्धांपासून सर्वांनाचा फास्टफूडमधील एक आयटम म्हणजे बर्गर. असा हा चटपटीत पदार्थ असलेला बर्गर आवडीचा असतो. आपण आत्तापर्यंत बर्गरच्या अनेक व्हरायटी चाखल्याही असतील परंतु आता चक्क 24 कॅरेट सोन्याचा वर्ख चढवलेला बर्गर अमेरिकेतील एका हॉटेलात मिळू शकणार आहे मात्र त्यासाठी तुम्हाला तब्बल 4 हजार रुपये खर्च करावे लागतील.

तुमच्यासाठी असा हा आगळावेगळा सोन्याचा बर्गर घेऊन आली आहे कोलंबियाच्या बोगोटा मधील एक रेस्तरॉं कंपनी. ही रेस्तरॉं कंपनी आपल्या लज्जतदार व स्वादिष्ट पदार्थ्यांच्या वैविध्यामुळे प्रसिद्ध आहेच त्यातच आता जोडीला त्यांनी  नववर्षात सोन्याचा बर्गर ही डिश सादर केली आहे. सोन्याच्या वर्खात लपेटलेला असा विशेष बर्गर पूर्णपणे खाण्यायोग्यच असल्याचे समजते. सोन्याच्या वर्खामुळे हा केवळ आकर्षक दिसतच नाही तर तो खूपच रूचकर असल्याचे खवय्यांनी सांगितले.

मुळातच जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अमेरिकेतही रेस्तरॉंमधील गर्दी लुप्त पावलेली होती पण आता परिस्थिती हळूहळू सुधारत चालली आहे व रेस्तरॉं,हॉटेल्सही पूर्वीप्रमाणे आज उघडलेली आहेत आणि याच संधीचा फायदा उचलत आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बोगोटामधील रेस्तरॉंने ही सोन्याचा वर्ख असलेला बर्गर विकण्याची अनोखी स्कीम आणलेली आहे.

स्थानिक मिडियाला दिलेल्या मुलाखतीत सदर रेस्तरॉंच्या शेफ मारिया पाऊलो यांनी सांगितले की, या बर्गरचे नाव हॅमबर्ग असे आहे. नेहमीच्या पदध्तीने प्रथम बर्गर आधी तयार केला जातो मग त्याला प्लॅस्टिकच्या बॅगने आच्छादित केले जाते व अखेरीस त्यावर सोन्याचा वर्ख चढवला जातो. हे काम खूपच नाजूक आणि जिकीरीचे असते त्यामुळे हे काम अत्यंत कुशलतेने व व्यवस्थित करावे लागते.

From around the web