शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्षच करावा लागणार - आ. राणाजगजितसिंग पाटील 

 
s

तुळजापूर  - ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांची वीज तोडली जाते, खरीप २०२० चा हक्काच्या पीक विमा अजुनही मिळत नाही, मराठा व ओबीसी बांधवांना आरक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे, महाविकास आघाडी सरकारकडुन सहजा सहजी कोणत्याही विषयात न्याय मिळत नाही व ‍मिळणारही नाही, त्यामुळे लोकनेते कै.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या संघर्षाची प्रेरणा घेवुन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापुर येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात बोलताना केले.

काल दि.१२ डिसेंबर २०२१ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक सचिन पाटील यांनी तुळजापुर येथे शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी बोलतांना आ.राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वीजेची नितांत गरज असतांना सरकार कृषी पंपाची वीज तोडत आहे, खरीप २०२० पीक विमा प्रकरणी चाल ढकल करणाऱ्या सरकारला उच्च न्यायालयाने चांगलेच खडसावल्यानंतर शासन व विमा कंपनी यांनी शपथपत्र दाखल केले. मराठा व ओबीसी समाज बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्नही अनेक महिन्यांपासुन प्रलंबीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनास आणुन दिलेल्या बाबींची पुर्तता सरकार प्राधान्याने करत नाही. अजुनही मराठा समाजाचा इंपेरियल डेटा गोळा करण्याचे निर्देश मागासवर्गीय आयोगाला देण्यात आलेले नाहीत.

जिल्हयात सर्वाधिक १५९ रोजगार हमी योजनेची कामे तुळजापुर तालुक्यात चालु आहेत. विकास कामात आम्ही कधी राजकारण आणत नाही. राजकीय विरोधकांनी कामे केली तरी चालतील, परंतू विकास कामे व्हायला हवीत, या भागाचा विकास व्हायला हवा, अशी भूमिका मांडली.

पंतप्रधान ना.नरेंद्रजी मोदी शासाठी काम करतात, कोणा एका व्यक्ती साठी नाही. अगदी शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न प्रशंसनीय आहे. पी.एम.किसान योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाते. कोवीड महामारीमध्ये सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोफत अन्नधान्य योजना राबविली. जगात इतरत्र कोठेही अशी योजना राबविण्यात आली नाही. ‘प्रशाद’ योजनेच्या माध्यमातुन तुळजापूर व परिसराचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

‘आत्मनिर्भर भारत’ योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी विवीध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र कमी होत चाललेले वाहिवाटीचे क्षेत्र लक्षात घेवून केवळ शेतीवर अवलंबून राहता येणार नाही, ही बाब लक्षात घेवून नव उद्योजक व लघु उद्योजकांसाठी अनेक क्रांतीकारी निर्णय मा.नरेंद्रजी मोदी साहेबांनी घेतले आहेत. केवळ ५ ते १०% गुंणतवणुक केल्यास केंद्र शासनाच्या माध्यमातुन भरीव अर्थसहाय व अनुदानाच्या योजना त्यांनी अमलात आणल्या आहेत.

आ.समाधानजी आवताडे यांनी ताकतीने पंढरपुरची जागा निवडुन आणली. जनतेचा भाजपवर व नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे, याचा प्रत्यय यातुन आला. आ. अवताडे यांच्या कार्य प्रणालीमुळे निश्चतच मतदार संघाचा मोठा कायापालट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत मा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच लोकनेते कै.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

यावेळी पंढरपुरचे नवनिर्वाचित भाजपा आमदार श्री. समाधानजी आवताडे यांचा सत्कार करण्यात आला. तुळजापूर येथील सत्कार म्हणजे साक्षात आई जगदंबेचा आशीर्वाद असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. आ. अभिमन्यू पवार यांनी देखील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा उपाध्यक्ष दिपक आलुरे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम देशमुख, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार गंगणे, पंचायत समितीच्या सभापती रेणुकाताई इंगोले, माजी जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. संतोष दादा बोबडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, विनोद गंगणे, प.स. उप सभापती साठे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, कार्यक्रमाचे आयोजक श्री. सचिन पाटील यांच्यासह नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक, शेतकरी बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

From around the web