राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचे आंदोलन व निदर्शने
 
sd

उस्मानाबाद - केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील किमतीत  पाच आणि दहा रुपयांची कपात करून नागरिकांना दिलासा दिला आहे आता राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाच्यावतीने निदर्शने करण्यात आली

 भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करून राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पेट्रोल-डिझेल वरचे व्हॅट कमी करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या आधी पेट्रोल वरील एक्साईज कर पाच रुपये प्रति लीटर तर डिझेल वरील एक्साईज कर दहा रुपये प्रति लीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. मोदी सरकारने ज्याप्रकारे पेट्रोल-डिझेल वरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही व्हॅट मध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे, असे काळे यांनी सांगितले. 

          आपल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल-डिझेल दर वाढीच्या विरोधात आंदोलने केली होती.  आता मोदी सरकारने पेट्रोल – डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्या नंतर आपल्या आघाडी सरकारनेही कर कपात करून आपल्या वतीने अधिक मदत केली पाहिजे, ही जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. तथापि, अजूनही आपल्या सरकार कडून टाळाटाळ होत असल्याने आघाडीतील घटक पक्षांची आंदोलने म्हणजे केवळ राजकीय मतलबीपणा होता हे स्पष्ट झाले आहे.    देशातील एकूण २३ राज्ये किंवा केंद्र शासित प्रदेशांनी आपल्या करात कपात करून पेट्रोल डिझेलच्या दरात अधिकची सवलत दिली आहे व त्यामध्ये भाजपा शासित राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. महाराष्ट्र राज्याने मात्र अद्याप सवलत दिलेली नाही, असेही काळे म्हणाले. 

     देशातील भाजपा प्रणित २३ राज्यासह इतरही राज्यामध्ये राज्य सरकारनी पेट्रोल व डिझेल वरील करात कपात करुन पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अनेक माध्यमातुन ईतकी वसुली करुन देखील पेट्रोल-डिझेलच्या करा मध्ये कपात करण्यात तयार नाही असा आरोप ही यावेळी नितीन काळे यांनी केला. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील सर्व घटक पक्षांनी व मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला वेठीस न धरता लवकरात लवकर पेट्रोल डिझेलचे कर कमी करुन महाराष्ट्रातील जनतेला बाजुच्या राज्यां प्रमाणेच दिलासा द्यावा अशी मागणी ही नितीन काळे यांनी केली.

            याप्रसंगी नेताजी पाटील, ॲड. खंडेराव चौरे, ॲड.नितीन भोसले, प्रदीप शिंदे, इंद्रजित देवकते, राजसिंह राजेनिंबाळकर, राजाभाऊ पाटील, राहुल काकडे, संदीप कोकाटे, विजय दंडनाईक, समाधान मते, प्रवीण शिरसाठे, रामदास कोळगे, संजय लोखंडे, मनोज रणखांब, नामदेव नायकल, अभय इंगळे, प्रवीण पाठक, दाजी पवार, पांडुरंग लाटे, ओम नाईकवाडी, विद्या माने, बाळासाहेब खांडेकर, युवराज ढोबळे, पांडुरंग पवार, मारुती मुंडे, लक्ष्मण माने, राहुल शिंदे, पृथ्वीराज दंडनाईक, महेश चांदणे, नाना कदम, नाना वाघ, हिम्मत भोसले, नितीन इंगळे, अमोल पेठे, प्रितम मुंडे, महेश बागल, गणेश इंगळगी, सूरज शेरकर, राज निकम, मेसा जानराव, सुजित साळुंखे, राजाभाऊ सोनटक्के, सार्थक पाटील, रोहित देशमुख, सुधिर पवार, प्रमोद बचाटे, सुनिल पंगुडवाले, बालाजी जाधव, महेश लांडगे, जगदिश जोशी, सुधीर घोलप, तेजस सुरवसे, सागर दंडनाईक यांच्या सह भाजपाचे तसेच मोर्चा व आघाड्यांचे असंख्य पदाधिकारी आंदोलन स्थळी उपस्थित होते. 

From around the web