महावसुली सरकारने वसुलीचा तगादा बंद करावा

सुरुळीत वीज पुरवठ्यासाठी भाजपा चा चक्का जाम

 
rana

उस्मानाबाद  -  राज्यातील शेतकरी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी सारख्या नैसर्गीक आपत्तीने हैराण असतांना वीज बील वसुलीसाठी सरसकट रोहीत्रे (डी.पी.) बंद करणे बळीराजावर अतिशय अन्यायकारक असुन सक्तीची वसुली बंद न केल्यास दिनांक ३ ‍डिसेंबर २०२१ रोजी चक्का जाम करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे, शेत जमिनीचे अभूतपूर्व असे नुकसान झाले आहे. दुर्दैवी जिवीतहानीच्या घटना देखील घडल्या आहेत. अशा परिस्थितीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या सर्वच स्तरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे असताना राज्य सरकार सक्तीची वीज वसूली करत आहे. वीज बिल भरणा न केल्यास ट्रांसफार्मर / विद्युत उपकेंद्र बंद करून शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत आहे. सदरील सक्तीची वसुली तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा सुरू करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना  दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी निवेदनाद्वारे दिला होता.

शासनाने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी पोटी अतिशय तुटपुंजे अनुदान जाहीर केले व तेही अपुर्ण देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. खरीप २०२० व २०२१ चा पिक विमा अद्याप देण्यात आलेला नाही. खरीपाची पिके तर पुर्णत: पाण्यात वाहुन गेली परंतु या वर्षी चांगला पाणीसाठा असल्यामुळे रब्बीच्या पिकाकडुन शेतकऱ्यांना थोडी फार आशा आहे, मात्र वीज पुरवठा खंडीत करुन त्या आशेवर देखील निष्ठुर महावसुली सरकार पाणी फेरत आहे. त्यामुळे काल भाजपा कार्यकर्त्यांच्या ऑडिओब्रीज द्वारे झालेल्या चर्चे मध्ये गावोगावी बैठका घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या पर्यंत पोहोंचविण्याचा, व एक आठवड्यात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे.

शेतकऱ्यांचे सरकार म्हणुन बिरुदावली मिरवणाऱ्या महावसुली सरकारच्या ‘करणी व कथनी’ मधील फरक या कृतीतून स्पष्ट झाला आहे. जगाच्या पोशींदयाला वेठीस धरणाऱ्या महावसुली सरकारचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करते. शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने व नियमीत वीज पुरवठा कधीच केला जात नाही. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यानंतर एक-एक महीना दुरुस्तीसाठी देखील पाठविला जात नाही. फ्युज गेल्यानंतर शेतकऱ्यांनाच रात्री अपरात्री अंधारात जावून फ्युज टाकावा लागतो. सेवा पुरविण्यात पूर्णतः अपयशी सरकार वसुलीसाठी मात्र अपार कार्यक्षम दिसत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावसुली सरकारला रुळावर आणण्‍यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन दि.३ डिसेंबर २०२१ रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

From around the web