लोहारा नगर पंचायतमध्ये  शिवसेना - राष्ट्रवादीला बहुमत 

 
de

लोहारा - लोहारा नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना - राष्ट्रवादी आघाडीला बहुमत मिळाले आहे. तर काँग्रेसला चार जागेवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना ९, राष्ट्रवादी २ , काँग्रेस ४ आणि अपक्ष २ असे पक्षीत बलाबल आहे. 

लोहारा नगरपंचायतची  निवडणूक पहिल्या टप्प्यामध्ये 13 जगासाठी लढविण्यात आली होती,  त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राहिलेल्या चार जागांसाठी निवडणूक घेऊन बुधवारी निकाल जाहीर करण्यात आले.या निवडणुकीमध्ये भाजपने आपले उमेदवार दिले नव्हते.

d

 शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची शिवराष्ट्र आघाडने चांगलीच बाजी मारली असून राष्ट्रवादीला शिवसेनेच्या तुलनेत जागा जरी कमी भेटल्या असल्या तरी देखील स्टार प्रचारक व निवडणूक प्रचार हा राष्ट्रवादी च्या खांद्यावर दिसून आला. शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले पहिल्या 13 जागा साठी निवडणूक होईपर्यंत लोहारा मध्ये तळ ठोकून होते. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील यांनीदेखील प्रचार सभा कार्नर बैठका घेऊन प्रचार केला.

 
विजयी उमेदवार असे-
  प्रभाग क्रमांक    विजयी उमेदवार 
 1  वैशाली अभिमान खराडे (शिवसेना)
 2  आरती  सतीश गिरी  (अपक्ष )
 3  गौस गफूर मोमीन (शिवसेना)
 4  प्रशांत बब्रुवान काळे (काँग्रेस)
 5  अमीन यासिन सुंबेकर (अपक्ष)
 6   मयुरी बाबू बिराजदार (शिवसेना)
 7   कमल राम भरारे ( शिवसेना)
 8   सारिका प्रमोद बंगले (शिवसेना )
 9  संगीता किशोर पाटील (काँग्रेस)
 10  विजयकुमार भानुदास  ढगे (काँग्रेस)
 11   सुमन दीपक रोडगे ( शिवसेना)
 12  जालिंदर श्रावण कोकणे (राष्ट्रवादी)ठ
 13  शमाबी आयुब शेख (शिवसेना)
 14 शामल बळीराम माळी (शिवसेना )
 15  आयुब हबीब शेख (राष्ट्रवादी)
 16  अरिफ हारून खानापूरे (काँग्रेस)
 17  आरती ओम कोरे (शिवसेना)

 
  

From around the web