परंडा :  राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर याच्या मुलाला अटक 

शासकीय आरक्षण असताना  जमीन खरेदी केल्याचा ठपका 
 
s

परंडा  - शासकीय आरक्षण असताना  जमीन खरेदी केल्याच्या प्रकरणी  परांडा नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणूकच्या पूर्वी राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे.

परंडा येथील जमीन सर्वे नं.234 /ब यांचे खरेदी खत करून नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आपल्या पदाचा गैरवापर व दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. स्वतः च्या मुलासाठी आरक्षित जमिनीचे बेकायदेशीररित्या नावे केल्याप्रकरणी वसीम जाकीर सौदागर यांच्या विरोधात भा.द.वि. कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज परंडा पोलिसांनी आरोपी वसीम सौदागर याला अटक केली आहे.

परांडा शहरातील 234 गट ब मधील जमिनीवर शासकीय आरक्षण आहे. पण तरी देखील जमीन खरेदी केल्याचा आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.  बाप लेकावर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

याआधी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून यात नगरपालिका मधील कर्मचारी सुद्धा तपासात दोषी आढळून आले होते. या प्रकरणाच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी आणि मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.  कोर्टात देखील खटला सुरू आहे. अनेक तक्रारी दाखल होऊन बराच कालावधी लोटल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे, त्यामुळे आता या प्रकरणातील मुख्य आरोपीला ही अटक करणार का याकडे लक्ष लागले आहे.

From around the web