उस्मानाबाद : भाजपाच्या वतीने ३ डिसेंबरला महाविरण कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन

 
s

उस्मानाबाद  -  प्रदेश सरचिटणीस  आ.सुजितसिंह ठाकुर व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली  भारतीय जनता पार्टी च्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

राज्यातील शेतकरी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी सारख्या नैसर्गीक आपत्तीने हैराण असतांना वीज बील वसुलीसाठी सरसकट रोहीत्रे (डी.पी.) बंद करणे बळीराजावर अतिशय अन्यायकारक आहे. जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे, शेत जमिनीचे अभूतपूर्व असे नुकसान झाले आहे. दुर्दैवी जिवीतहानीच्या घटना देखील घडल्या आहेत. अशा परिस्थितीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या सर्वच स्तरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे असताना राज्य सरकार सक्तीची वीज वसूली करत आहे.

वीज बिल भरणा न केल्यास ट्रांसफार्मर / विद्युत उपकेंद्र (Sub Station) बंद करून शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत आहे. शासनाने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी पोटी अतिशय तुटपुंजे अनुदान जाहीर केले व तेही अपुर्ण देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. खरीप २०२० व २०२१ चा पिक विमा अद्याप देण्यात आलेला नाही.

शासनाने सदरील सक्तीची वीज बील वसुली तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा सुरू ठेवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या मार्फत मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे यांना  दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी निवेदनाद्वारे दिला होता. परंतु अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या या गंभीर विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ११.वाजता  अधीक्षक अभियंता, महावितरण उस्मानाबाद यांच्या कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीन काळे,  नेताजी पाटील, विक्रम मालक देशमुख, राजाभाऊ पाटील, संतोषदादा बोबडे, राजसिंह राजेनिंबाळकर, विजय शिंगाडे, रामदास कोळगे, निहाल काझी, नामदेव नायकल, दत्तात्रय सोनटक्के, राहुल काकडे, अभय इंगळे, अजित ‍पिंगळे, अरुण चौधरी, यांच्यासह भाजपाचे असंख्य पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

From around the web