पंधरा दिवसात वीज पुरवठा  सुरळीत नाही झाल्यास रुमने हातात घेणार 

– खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
 
OMRAJE

धाराशिव -  कृषी पंपाना पुरेशा दाबाने सुरळीत वीज पुरवठा करावा आणि विजेचा लपंडाव थांबवावा, या मागणीसाठी राज्य सरकार व महावितरणच्या विरोधात शिवसेना ठाकरे सेनेच्या वतीने मुख्य महावितरण कार्यालयाच्यासमोर  धरणे आंदोलन करण्यात आले. तर धाराशिव  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. 

धाराशिव जिल्हात पाऊस लांबल्यामुळे शेतकरी बांधवावर दुष्काळाचे संकट असताना पाण्याअभावी पिके सुकत आहेत.‍ त्यातच महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी दुहेरी आस्मानी संकटात सापडला आहे.भारनियमन आणि विजेच्या लपंडावामुळे शेतीचा विजपुरवठा दोन-दोन दिवस खंडीत होत आहे. त्यामुळे एकेरी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. दुसऱ्या पावसाचे अत्याल्प प्रमानामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवलदिवल झाला आहे.

अतिरिक्त केले जाणारे भार नियमण बंद करण्यात यावे व नियमीतपणे 8 तास योग्य दाबाने सुरळीत पणे विजपुरवठा करण्यात यावा, उच्चदाब प्रणाली  योजने अंतर्गत मंजुर असलेले वैयक्तीक विद्युत संच जोडणीची (HVDS) प्रलबिंत कामे तात्काळ पुर्ण करावीत.  शेतकऱ्यांना वाहतुक व्यवस्थेचा कोणताही आर्थिक भार न लावता नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलुन देण्याची अंमलबजावणी करावी व जिल्हा कृषी आकस्मिक निधी योजने अंतर्गत मंजुर असलेले अतिरिक्त उपकेंद्र रोहीत्रची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत तसेच या योजने अंतर्गत मंजुर झालेले उपकेंद्र रोहित्र  क्षमतावाढचे  प्रलंबीत कामे पुर्ण करण्यात यावे.(ढोकी, केशेगांव, शहापुर, बेडगा),  अतिरिक्त ओव्हरलोड फीडरचे भार व्यवस्थापण व्यवस्थीत करुन सुरळीत विजपुरवठा करण्यात यावा, रोहित्र वरील किरकोळ दुरुस्तीचे कामे हे आपल्या अधिकृत कुशल मनुष्यबळा मार्फत करण्यात यावीत. तसेच विज अपघातातील पिडीताचे व पात्र नुकसान ग्रस्त शेतकऱ्याना तात्काळ नुकसान भरपाई अदा करावी, गावातील किरकोळ दुरुस्ती समस्या निवारणा करिता विज कर्मचारी हा नेहमी उपलब्ध असावा, RDSS या योजनेतील कामे लवकरात लवकर करण्यात यावीत, सन 2021 ते 2023 मधील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत झालेल्या कामाचा दर्जा त्रयस्त  समिती मार्फत पडताळणी करण्यात यावा,  विशेष म्हणजे जिल्हा कृषी आकस्मिक निधी व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ज्या रोहीत्राची कामे झाले आहेत त्या ठिकाणी  जुने रोहीत्रे बसवण्यात आले आहेत का ? या बाबत  त्या कामाची चैकशी करण्यात यावी, महावितरण तर्फ केले जाणारे देखभाल व दुरुस्तीचे (मेंटेन्स) हया कामाचे बील गुतेदारांना देण्यात आले आहे. त्या कामाची चौकशी करण्यात यावी काही ठिकाणे असे निर्देशनास आले आहे की काम न करता देयके (बील) देण्यात आली आहे, वरील मागण्यावर तात्काळ अंमलबजावणी करावी. यासह अनेक मागण्याचे निवेदन  मा जिल्हाधिकारी  व अ धि क्षक अभीयंता म हावितरण यांना देण्यात आले.  

विजवितरण कंपनीचया अधि काऱ्याने वरील सर्व मागण्यांचा 15 दिवसात सोडवणे व यावर योग्य मार्ग काढून असे आश्वासन जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या समक्षते दिल्यानंतर सदरील धरणे अंदोलन मागे घेण्यात आले. राज्य सरकार हे शेतकरी विरोधी असून यांना शेतकऱ्याबदृल कसलाही कळवळा नाही त्यामुळे आपण शेतकऱ्याच्या या मागण्यासाठी हातात वेळ प्रसंगी रुमने घेवू आम्ही शिवसेना उभे राहू असे शेतकऱ्या सोबत जाहिर केले.यावेळी संतप्त शिवसैनिक आणिशेतकऱ्यांनी महावितरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली. 

                   यावेळी आ. कैलास पाटील, सह संपर्क प्रमुख नंदुभैय्या राजेनिंबाळकर जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, उपजिल्हाप्रमुख प्रदिप बप्पा मेटे, विभागीय सचीव अक्षय ढोबळे,  धाराशिव तालुका प्रमुख सतीश सोमाणी, तुळजापुर तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, वाशी तालुकाप्रमुख विकास मोळवणे, उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, विश्वजीत नरसिंग जाधव, शामभैय्या जाधव, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, उमरगा शहर प्रमुख रणधीर सुर्यवंशी,  संग्राम देशमुख, संजय देशमुख डी. सी. सी. बँक, सुधाकर पाटील,नितीन शेरखाने, दत्ता बंडगर, रवि वाघमारे, बाळासाहेब काकडे, पंकज पाटील, मुजीफ काझी, आबेद सय्यद, कलीम कुरेशी, धनंजय इंगळे, अमोल मुळे आफरोज पिरजादे,निलेश शिंदे, राणा बनसोडे,दिनेश बंडगर,दिपक पाटील अभिजीत देशमुख, काका शिनगाडे,विशाल जमाले, तुळशीदास जमाले, अंकुश मोरे, सचीन शेंडगे, मोईन पठाण, शहबाज पठाण, नवज्योत शिंगाडे, हनमंत यादव बापू साळुंके,विजय कुंदरे, छोटा साजीद, गफुर शेख, राजाभाऊ भांगे, रवी कोरे, परीक्षित विधाते, मनोहर धोंगडे, आदिनाथ इंगळे, नामदेव कांबळे, अतीक सय्यद, पवन सावंत. यासह पदधिकारी उपस्थित होते.

From around the web