पालकमंत्री शंकरराव गडाख ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून चेकडॅमवर

उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करुन शेतकऱ्यांनी उत्पादनात वाढ करावी - पालकमंत्री 
 
s

उस्मानाबाद -  राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या चेकडॅम मुळे त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. जवळच्या सिंचन विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या उपलब्ध पाण्याचा योग्य प्रकारे वापर करुन आपल्या उत्पादनात वाढ करावी आणि आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज केले आहे.

जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तुळ) आणि बोरदनवाडी येथील चेकडॅम तसेच दिपकनगर (कामठा तांडा) येथील पाझर तलावाच्या कामांची पाहणी आणि जलपूजन कार्यक्रमात  औपचारिकरित्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना हे आवाहन श्री.गडाख यांनी केले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा जलसंधारण अधिकारी चेतन कलशेट्टी, उपअभियंता (जलसंधारण) महादेव आदटराव आदी उपस्थित होते.

हंगरगा (तुळ) येथील चेकडॅमवर 33 लाख 10 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. 30.10 चौरस कि.मी. अशी या चेकडॅमची लांबी आहे, तर उंची 1.00 मीटर आहे. गेटची संख्या 10 नग असून गाळ्यांची संख्या संख्या पाच आहे.या चेकडॅमची 30.91 सघमी पाणी साठवण्याची क्षमता आहे.सिंचन क्षमता 6.00 हेक्टरची आहे.बोरनदवाडी येथील चेकडॅमवर 37.05 लाख रुपये खर्च झाला आहे.18.58 चौ.से.मी चे पाणलोट क्षेत्र असून या चेकडॅमची लांबी 33.00 मीटर तर उंची 1.00 मीटर आहे.गेटची संख्या 10 नग,तर गाळयांची संख्या पाच नग आहे.या चेकडॅमची साठवण क्षमता 36.00 सघमी आहे.सिंचन क्षेत्र 7.00 हेक्टरचे आहे.

 जि.प.च्या जलसंधारण विभागातर्फे दिपकनगर (कामठा तांडा) येथील पाझर तलावाचे काम केले आहे. या कामावर 9 लाख 39 हजार 63 रुपये इतका खर्च झाला आहे.या पाझर तलावाची साठवण क्षमता 128 सघमी आहे.तर सिंचन क्षमता 33.30 हेक्टर आहे. या तलावाची लांबी 210 मीटर आहे.

 तुळजापूर ऑक्सीजन टँकची पाहणी    

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणाना मोठया प्रमाणात सुविधा निर्मितीसाठी प्रयत्न आहे.त्याचाच भाग म्हणून तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात 13 के एम लिक्विड मेडिकल ऑक्सीजन टॅकची उभारणी  करण्यात आली आहे.या टॅकचे काम पूर्ण झाले आहे.त्यास भेट देऊन आज पालकमंत्री श्री.शंकरराव गडाख यांनी पाहणी केली आणि काही महत्वपूर्ण सूचनाही यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. प्रामुख्याने अशा टँक मधून ऑक्सिजनची गळती होणार नाही, त्याची खबरदारी घेण्यात यावी. त्यासाठी  व्यवस्था करावी. या ऑक्सिजनचा नेमका आणि योग्य  प्रकारे वापर व्हावा म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे आदी सूचनाही यावेळी श्री.गडाख यांनी केल्या. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.किशोर पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के. पाटील, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंचला बोडखे आणि तेथील वैद्यकीय कर्मचारी-डॉक्टर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.गडाख ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून चेकडॅमवर

      धरण, पाझर तलाव, साठवण तलाव किंवा चेकडॅमची ठिकाणं ही आडवाटेवर असतात.कारण योग्य ठिकाण पाहुनच त्यांची बांधकामं केली जातात. त्यामुळे अशा ठिकाणावर पोहचण्यासाठी सरळ धोपट, पक्का रस्ता असेलच असे सांगता येत नाही. आजही ही परिस्थितीहोती. पालकमंत्री श्री.गडाख हे तुळजापूर तालुक्यातील बोरनदवाडी येथील चेकडॅमच्या पाहणीआणि जलपूजनासाठी गेले असता चेकडॅमवर जाण्याच्या रस्त्यावर शासकीय वाहनं जाऊ शकतनव्हती. तेंव्हा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची चेकडॅमवर जाण्यासाठी सोय करण्यात आली होती. गावकऱ्यांचाउत्साह आणि अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेला दिलेलं प्राधान्य, यामुळे पालकमंत्र्यांनी जातानाट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून चेकडॅमपर्यंतचा प्रवास केला. सोबत खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलासपाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता आणि इतर अधिकारी होते. चेकडॅमवरुनपरतताना मात्र पालकमंत्र्यांनी दुचाकीला प्राधान्य देऊन दुचाकीवरुन प्रवास केला.

        
 

From around the web