राणा पाटलांना आता शेतकऱ्यांची आठवण आली का ?
![s](https://osmanabadlive.com/static/c1e/client/83983/uploaded/9b9f71dcbea18e7db7700b30493d8e29.jpg)
- आ. कैलास पाटील यांचा पलटवार
उस्मानाबाद - शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या मोदीसाहेबांचे तुणतुणे वाजवुन झाल्यावर आता महाशयाना शेतकऱ्यांची आठवण आली का ? त्यातही शिवसेनेन काय केल हे विचारायची तुमची नैतिकता नाही , असा थेट हल्ला शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी आमदार राणा पाटील यांच्यावर चढविला आहे.
शिवसेनेच्या मंत्र्याचा रस्ता आडवायचा नुसता प्रयत्न तरी करुन बघा मग समजेल पत्रक काढण्याइतक ते सोप आहे का असेही प्रतिआव्हान त्यानी यावेळी राणा पाटील यांना दिले.
शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत नेमके काय केले आहे ?
भाजपचे केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे सिध्द होत असल्याचे लक्षात येऊ लागल्यावर पत्रक काढुन शिवसेनेवर आरोप करण्याचा तुमचा केविलवाणा प्रयत्न आहे, हे जनतेला समजत नाही हा तुमचा गैरसमज आहे. शिवसेना काय करते अन् काय नाही याचा तुम्हाला चांगलाच अनुभव आहे, शिवाय हे मी तुम्हाला सांगतोय यासारखा तर योगच नसल्याचा चिमटा कैलास पाटील यांनी काढला.शिवसेनेला हिशोब मागायची किमान तुमच्यात व तुमच्या पक्षात नैतिकता उरली असेल अस मला वाटत नाही. जेव्हा शिवसेनेन काय केल विचारता तेव्हा तुमच्या 40 वर्षाच्या कारभाराचाही लेखाजोखा मांडलात तर जनतेलाही बर वाटेल असा सल्ला आमदार कैलास पाटील यानी दिला.
जिल्ह्यात 40 वर्षात विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याचे काम शिवसेनेच्या फक्त दोन वर्षाच्या सत्तेत होत आहे, याचा तुम्हाला पोटशुळ सुटला आहे. त्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे कशावरही पत्रक काढुन शिवसेनेला लक्ष्य करण्याचा तुमचा हेतु कधीच सफल होणार याची जाणीव आपण ठेवावी. नाचता येईना अंगण वाकडे अशी म्हण आपल्या समाजात प्रसिध्द आहे, राजकारणातही ती लागु होते. ती कोणाला लागु होते याबद्दल मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. पिकविम्याच्या बाबतीत शिवसेनेन केंद्रात विमा कंपन्याचा करार रद्द करण्याची मागणी केली ती तुमच्या भाजप सरकारने नाकारली.
भाजप सरकार व विमा कंपन्या याची थेट सेंटलमेंट आहे. गेल्यावर्षी पिकविम्याच्या बाबतीत विमा कंपन्याची मुजोरी उतरविण्यासाठी कायदेशीर मार्गाचा लढा शिवसेना देत आहे. तेव्हा तुम्ही राज्य सरकारविरोधात पत्रक बाजी करत होता.केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीनच्या दरात घसरण होत असताना तुम्हाला फुटकळ शेरेबाजी करुन प्रसिध्दी मिळवायची हौस निर्माण झाल्याचेही आमदार तथा जिल्हा प्रमुख कैलास पाटील यांनी म्हटले आहे.