धाराशिवच्या खासदाराचा खोटारडेपणा पुन्हा उघड– नितीन काळे

 
kale n

धाराशिव - न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यात पटाईत असलेल्या खासदाराचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे , अशी टीका भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी खा. ओमराजे निंबाळकर यांचे नाव न घेता केली आहे. 

तुळजापूर- सोलापूर रेल्वे मार्ग निविदा प्रकाशित होताच न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यात पटाईत खासदार सरसावले आहेत. यांच्या निष्क्रीयतेमुळे ठाकरे सरकारच्या काळात हा प्रकल्प रखडला. शिवसेनेचे तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी या प्रकल्पासाठी निधी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे धादांत खोटे, बेताल व धाराशिव करांच्या जिव्हारी लागणारे वक्तव्य विधानसभेच्या सभागृहात केले होते. त्यामुळे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता.

 रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसह खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरून तत्कालीन मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे यांच्याकडे राज्याच्या हिश्याच्या रकमेची मागणी केली होती. मात्र जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी व ठाकरे सरकारच्या जिल्हाप्रती असलेल्या प्रचंड अनास्थेमुळे या रेल्वेमार्गाबाबत काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. याउलट राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येताच आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी या रेल्वेमार्गासाठी 50 टक्के निधी देण्याचा विषय मार्गी लावला व प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी कामाचे तीन टप्पे करुन पहिल्या टप्प्यातील निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली. त्याच बरोबर अमृत भारत योजनेमध्ये धाराशिव रेल्वे स्थानकाचा सामावेश करत स्थानकाच्या नुतनीकरणासाठी रु २१ कोटी निधी मंजुर करुन घेतला.

खोटं बोलण्यात पटाईत असलेल्या खासदाराचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे. अधिकारी कर्मचारी यांच्या स्तरावरील कामे केल्याचे खासदार सांगत हे दुदैव आहेत. रेल्वे स्तनकाच्या भुमी पुजन प्रसीगी देखील रॅक बाधंकाम व इतर कामे निवीदा स्तरावर आलेली त्यांना माहित नव्हती. यातुनच त्यांचा पाठपुरावा व कार्य पध्दती उघड होते. त्यांनी स्वतः च महायुती सरकारने निधी दिल्याचे मान्य केले आहे.  अडीच वर्षे सत्ता असूनही यांच्या नाकर्तेपणामुळे रेल्वेचा प्रश्न प्रलंबित राहिला, अन्यथा आज सोलापूर - धाराशिव रेल्वे प्रत्यक्षात रुळावर दिसली असती. राज्यातील महायुती सरकार व केंद्रातील मोदी सरकार हे जिल्ह्यातील प्रलंबित विषय वेगाने मार्गी लावत असून पर्याप्त निधी उपलब्ध करून देत आहे. निवीदा प्रसिध्द झाल्याच्या  बातम्या आल्यानंतर हे श्रेय लाटण्याचा केवीलवाना प्रयत्न खासदार करत आहेत.ये जनता सब जानती है ! असेही नितीन काळे यांनी म्हटले आहे. 

From around the web