आ. राणा पाटील , आ. सुरेश धस यांच्या बगलबच्चामुळे नळदुर्गचा विकास खुंटला 

गैरव्यवहार सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेईन
 
s
राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांचा पलटवार 

नळदुर्ग -  भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि  भाजपचे विधान परिषद सदस्य सुरेश धस यांच्या बगलबच्चामुळे नळदुर्गचा विकास खुंटला असल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांनी केला आहे. 

अशोक जगदाळे यांच्या भगिनी रेखा जगदाळे या नळदुर्गच्या नगराध्यक्षा आहेत. नळदुर्ग नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे विधान परिषद सदस्य सुरेश धस  यांनी केला होता. 

त्यावर पलटवार करताना अशोक जगदाळे म्हणाले की, नळदुर्ग नगर पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असल्यामुळे आ. राणा पाटील , आ. सुरेश धस यांच्या बगलबच्चाची दुकाने बंद झाली आहेत. विकास झाला नाही, अशी ओरडाओरड सुरु आहे. याच बगलबच्चानी टेंडर प्रणालीमध्ये  बिलो टेंडर भरून वेठीस धरले आहे.त्याची पोलीस चौकशी झाल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.यासंदर्भात आपण गृह मंत्र्याकडे तक्रार करणार आहोत. 

नळदुर्गचा विकास केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, जी कामे अर्धवट अवस्थेत आहेत, त्याचे टेंडर काढले असून, एका महिन्यात सर्व कामे सुरु होतील,गैरव्यवहार सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेईन, असेही जगदाळे म्हणाले. 


 

From around the web