वाशी नगर पंचायत निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व

 
sd

 वाशी  -  वाशी नगर पंचायतमध्ये आ. राणाजगजितसिंह पाटील व आ. सुजितसिंह ठाकुर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी शहरातील एक उमदे नेतृत्व आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बप्पा कवडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव कॅप्टन संकेत चेंडे यांच्या सहकार्याने वाशी नगर पंचायतमध्ये 17 पैकी 10 जागांवर भारतीय जनता पार्टीने विजय संपादन करत  ऐतिहासिक विजय मिळवला आहे . 

 जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी दिलेले खोटे  आश्वासन आणि कसल्याही अमिशास किंवा भूलथापांना बळी न पडता शहराच्या विकासाला प्राधान्य देत वाशी शहरातील जनतेने सत्ताधारी लोकप्रतिनिधीना डावलून वाशी नगर पंचायत मध्ये प्रथमच भारतीय जनता पार्टीला निवडून दिले आहे, त्याबद्दल मतदारांचे आभार ,आणि आपण दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरू आणि शहराचा विकास करू, अशी ग्वाही आ. राणाजगजितसिंह पाटील व आ. सुजितसिंह ठाकुर यांच्यानेतृत्वाखाली यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे व सुरेश बप्पा कवडे यांनी दिली .

sd

            वाशी नगर पंचायत निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयामध्ये वाशी शहरातील नागरिकांचा आशिर्वाद असल्याचे सांगत भारतीय जनता पक्ष्याच्या वतीने भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे तसेच, सुरेश बप्पा कवडे, कॅपन संकेत चेंडे व नवनियुक्त सदस्य यांनी मतदारांचे आभार मानले, सर्व नवनियुक्त सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला , तसेच शहरात  j. C. B ने गुलाल उधळत विजयी रॅली काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला .

            येणाऱ्या काळात आम्ही दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्ती करत वाशी शहराचा चेहरामोहरा बदलून शहराचा सर्वागिण विकास करणार असल्याचे सुरेश बप्पा कवडे यांनी विजयी रॅली झाल्यावर सांगितले. याप्रसंगी,  प्रदिप शिंदे, राजसिंह राजेनिंबाळकर, महादेव आखाडे, महेश चांदणे,तसेच नवनिर्वाचित सदस्य सुरेश बप्पा कवडे,  स्मीता अमोल गायकवाड, वंदना सुहास कवडे, श्रीकृष्ण लहू कवडे, विजयाबाई सुकाळे, विकास शिवाजी पवार, संजना शिवशंकर चौधरी, वनमाला शिवानी उंदरे, बळवंत कवडे, भागवत भास्कर कवडे, यांच्यासह अॅड .कुलदिपसिंह भोसले, ओम नाईकवाडी , हिम्मत भोसले, प्रसाद मुंडे तसेच भाजपचे  प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

From around the web