गोपीचंद पडळकर व सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीचे जोडे मारो

 
s

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे भाजपच्या गोपीचंद पडळकर व कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रतिमेला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत  हे आंदोलन करण्यात आले.  यावेळी गोपीचंद पडळकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या विरुद्ध घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला होता. 

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,जि.प.माजी गटनेते महेंद्र धूरगुडे ,युवा नेते प्रतापसिंह पाटील,जिल्हा सरचिटणीस नितीन बागल,सामाजिक न्याय मराठवाडा अध्यक्ष संजय कांबळे ,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, कळंब तालुकाध्यक्ष श्रीधर भवर,कळंब तालुका कार्याध्यक्ष शिवाजीराव लाकडे,तुळजापूर विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे,भूम तालुकाध्यक्ष हनुमंत पाटूळे,लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे,तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील,उमरगा तालुकाध्यक्ष संजय पवार,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष श्याम घोगरे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील, युवती अध्यक्षा सक्षणा सलगर,  सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे,डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष अविनाश तंबारे,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी,उस्मानाबाद तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख,वक्ता सेल तुषार वाघमारे,युवक प्रदेश सचिव रोहित बागल,युवक प्रदेश सर चिटणीस नितीन बिक्कड,कळमयुवक तालुकाध्यक्ष भीमा हागरे,विद्यार्थी तालुकाध्यक्ष प्रतिक माने,युवती शहर अध्यक्षश्वेता दूरुगकर, लोहारा शहराध्यक्ष अयुब शेख,उमरगा शहराध्यक्ष खाजा बाबुलाल मुजावर,उस्मानाबाद शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल सचिन तावडे,भास्कर खोसे,अप्सरा पठाण, संतोष पवार,सुभाष यादव,तोफिक शेख,मृत्युंजय बनसोडे,सुनंदा भोसले आदींची उपस्थिती होती.

From around the web