भुयारी गटार योजनेत अडकाठीचा हेतू नव्हताच,विषय कमिशनखोर त्रिकुटाचे सत्य समोर मांडणे हा होता ... 

माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे  यांचा माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यावर पलटवार 
 
d

उस्मानाबाद  - शहरातील भुयारी गटार योजनेच्या अंमलबजावणी बाबतीत न्यायालयात धाव घेऊन या योजनेच्या  कंत्राट देण्यापासून सुरू झालेली अनियमितता समोर मांडण्याचा प्रयत्न केला होता, शहरातील कोणत्याही विकासकामांना विरोध करणे ही भाजपच्या राजकारणाची पद्धत नसून विकासाच्या आडून कोणी स्वतःच्या आर्थिक हिताला प्राधान्य देत असेल तर मात्र भाजपा गप्प बसणार नाही कारण आमची बांधिलकी ही जनतेशी आहे. जनतेचा पैसा अत्यावश्यक योजनांवर खर्च व्हावा एवढा आग्रह न्यायालयात याचिका दाखल करण्यामागे होता, असा पलटवार माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे यांनी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यावर केला आहे. 

नगरपरिषदेच्या कारभारात विकास केला जातोय की हितसंबंधी कंत्राटदार पोसले जात आहेत अशी दुरवस्था वारंवार दिसून आली,प्रशासकीय यंत्रणा तत्परतेने जनसेवेत असावी लोकांची लहान लहान कामे खोळंबुन राहु नयेत एवढा उद्देश सफल झाला नाही,नगरपरिषद व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धडपड करणारे इतर लोकप्रतिनिधी हे जनतेच्या हितापेक्षा स्वतःच्या हिताला प्राधान्य देताना जाणवत होते,त्यातीलच 1 भाग म्हणुन भुयारी गटार ही योजना आखली गेली,त्यासाठी आवश्यक कंत्राट देण्यासाठीचे नियम डावलले गेले व मर्जीतील कंत्राटदार नेमले गेले.

शहराचा विकास झाला पाहिजे मात्र हितसंबंधातील कंत्राटदार  नगरपरिषदेचे त्रिकुटाची भरभराट व्हावी असा प्रयत्न होताना दिसून येतो, भुयारी गटार बांधण्यासाठी लागणाऱ्या सिमेंट पाईपचे पीक कोणाच्या शेतात जोमाने फोफावले आहे आणि या पिकाच्या उत्पादनातुन कोणाचा विकास होणार आहे हे लपून राहिलेले नाही.आर्थिक हितासाठी चाललेल्या प्रयत्नांचे हे सर्व षंढयंत्र न्यायालयाच्या समोर मांडण्यात काही अपयश आले असले तरी जनतेच्या न्यायालयात टक्केवारीचा बाजार उघड झाला आहे, सत्य थोडा वेळ झाकले जाईल मात्र एकदिवस हे सत्य पुन्हा समोर येईल. 

शहराच्या विकासात कोणी अडचण आणत नाही, मात्र त्रिकुटाच्या आर्थिक विकासावर अंकुश येत असल्यामुळे माजी नगराध्यक्ष आज आगपागड  करत आहेत. सत्यासाठी आम्ही यापुढेही न्याय मागणारच.  भुयारी गटार योजनेतील भ्रष्टाचार लवकरच जनतेसमोर उघड करू. शहर विकासाच्या  नावाखाली स्वतःची घरे भरण्याचा उद्योग सुरू आहे. यांच्या आर्थिक विकासात आडकाठी येत असल्यानेच यांचा तिळपापड होत आहे. मात्र शासनाच्या निधीचा योग्य वापर व्हावा, यासाठी आमचा सदैव प्रयत्न आहे व राहील, असेही अभय इंगळे यांनी म्हटले आहे. 

From around the web