उस्मानाबाद येथे राज्यपाल कोशारी भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांच्या प्रतिमेस ठाकरे सेनेचे जोडे मारो आंदोलन

 
saw

उस्मानाबाद - हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या प्रकरणात राज्यपाल भगत सिंह कोशारी व भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांच्या पुतळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. विषारी कोशारी हटाव व भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी याचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन दोघांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
 

उस्मानाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी (दि.21) जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील, मा. नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

 यावेळी शिवसेना शहरप्रमुख संजय मुंडे, आतिष पाटील, माजी गटनेते  सोमनाथ गुरव, संपदाताई धोंगडे,  मा.शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, युवानेते पंकज पाटील उपशहरप्रमुख बंडू आदरकर, सुरेश गवळी, तुषार निंबाळकर, रवी कोरे, गणेश असलेकर, बापू देशमुख, अजित बाकले, दिनेश बंडगर, नेताजी राठोड, संकेत सूर्यवंशी,  मनोज पडवळ, नाना घाडगे ,विनोद केजकर, अजय नाईकवाडी, सतीश लोंढे, अमित जगधने, सुधीर अलकुंटे, यशवंत शहापालक,गजेंद्र पडवळ, महेश लिमये, संदीप शिंदे, पिंटू पवार, साजिद, बालाजी कांबळे, रामप्रसाद पवार, विलास कांबळे, सिद्दीक तांबोळी, शकीलभाई जे के,अण्णा यादव आदी उपस्थित होते.

From around the web