राष्ट्रवादीची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

ऊस बील न देणार्‍या कारखान्याविरोधात घोषणाबाजी
 
asx

उस्मानाबाद : सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड व जय हिंद शुगर प्रायव्हेट लिमिटेड यासह इतर पाच कारखान्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे ऊस बिले काढावीत, या मागणीसाठी गुरुवारी (दि.21) जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली ऊस बील न देणार्‍या कारखान्याविरोधात घोषणाबाजी करत शेतकर्‍यांनी जोरदार निदर्शने आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी अतिरिक्त झालेला ऊस उस्मानाबाद जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कारखान्याकडे सन 2021-2022 जानेवारी ते मे महिन्यापर्यंत पाठविला होता. ऊस पाठवून 4 महिने होत आले. परंतू ऊस घेवून जाणार्‍या साखर कारखान्यांनी अद्यापपावेपर्यंत ऊस बीलाची पहिली उचल ही दिली नाही त्यांचा आम्ही धिक्कार करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसांमध्ये पावसाचे आगमन झालेले असल्यामुळे शेतकरी पेरणी करत आहेत. शेतकर्‍यांच्या समोर अनंत आर्थिक अडचणी असल्यामुळे जिल्ह्यातील तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. असे असताना शिक्षणाचा खर्च, दवाखाना खर्च अशा मोठ्या अर्थिक संकटात शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी ज्या साखर कारखान्यांनी ऊसाची पहिली ही रक्कम अद्याप दिलेली नाही. अशा कारखान्याकडून ऊसाची पाहिली उचल येत्या चार दिवसामध्ये देण्यासंबधी संबंधित कारखान्यांना सूचित करावे, अन्यथा या कारखान्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी रमेश देशमुख, बाळासाहेब सरवदे, रामराव टेकाळे, काशिनाथ खडके, सतीश सरवदे, राजाभाऊ भिसे, तुकाराम भिसे, प्रकाश मुंदडा, जगदिश जोशी, वरुन पाटील, हनुमंत गरड, लालासाहेब शितोळे, नानासाहेब शितोळे, विक्रम माळी, गोकुळ गोरे, शाम घेवारे, उत्तम शितोळे, भारत शिंदे, मदन पवार, अशोक आजबे, इकबाल पटेल, अशोक बिरंजे, नानासाहेब नलावडे, नामदेव चव्हाण, जनक पाटील, डी.बी.कापसे, मदन पवार, विलास पवार, रमेश टोणगे, विनायक बोरकर, पवन अभंग, राजाभाऊ टेळे, दत्ता ईटकर, गुणवंत काळे, आप्पा बिटके, भारत सुरवसे, राजमहमद शेख, अभिजीत देशपांडे, सुनिल डोंगरे, अभिजीत माळी बाळासाहेब ठाकर, चंदू पवार, विवेकानंद कापसे, विक्रम माळी, अमोल घेवारे आदी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
 

From around the web