धाराशिव शहरातील विविध योजनांना दिलेल्या स्थगिती हटविण्याबाबत शिवसेनेचे निवेदन

 
ad

धाराशिव - धाराशिव शहरातील विविध समस्या सोडवून नागरी योजनांना दिलेली स्थगिती उठवण्यात यावी या मागणीचे निवेदन शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास घाडगे पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली  शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिले आहे. मागणीची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही सोमनाथ गुरव यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की,  उस्मानाबाद शहरातील नगर पालिकाअंतर्गत महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान योजना, नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजना या विकासकामांना 30 मार्च 2022 रोजी प्रशासकीय मान्यता दिली असुन प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्याकडुन जाणूनबुजून निविदा उघडण्यात आलेल्या नाहीत. सदरील विकासकामांच्या निविदा उघडून विकासकामांचा कार्यारंभ आदेश लवकरात लवकर देणे आवश्यक असून या प्रकरणी न.प. सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता केव्हाही लागू शकते. 

सदरील कामे सन 2021-22 या आर्थिक वर्षातील असल्यामुळे कामे पूर्ण होऊन 31 मार्च 2023 पर्यंत निधी खर्च होणे पूर्ण होणे अपेक्षित असून यासाठी केवळ 3 महिन्याचा कालावधी राहिला आहे. सदर कामाबाबत कार्यवाही वेळेत न झाल्यास निधी अखर्चित राहून विकासकामांना अडथळा निर्माण होईल. यासाठी या योजनेअंतर्गत मंजूर कामांना तात्काळ कार्यारंभ आदेश देण्यात यावेत. तसे न झाल्यास प्रशासन व राज्य शासनाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 21 डिसेंबर 2022 पासून मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनावर शिवसेनेचे सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडेे, प्रवीण कोकाटे, गणेश खोचरे, प्रदीप घोणे, पंकज पाटील, बंडू आदरकर, अजय नाईकवाडी, अमित जगधने, अमित उंबरे, दिनेश बंडगर, गोविंद कौलगे, सतीश लोंढे आदींची स्वाक्षरी आहे.

From around the web