उस्मानाबाद शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची शिवसेनेची मागणी

 
f
उस्मानाबाद - नगर परिषदेच्यावतीने शहराला करण्यात येणारा पाणी पुरवठ्यामध्ये विस्कळीतपणा आला आहे. ऐन हिंदुंच्या सणासुदीच्या तोंडावर विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणीसाठी खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे दि.१५ ऑक्टोबर रोजी केली आहे.

निवेदनात  म्हटले आहे की, नगर परिषदेने विद्युत बील न भरल्यामुळे तेरणा, उजनी, खांडवी पंप हाऊस व रुईभर फिल्टर या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर मागील आठवड्यामध्ये नवरात्र महोत्सवात नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावे लागल्यामुळे नागरिकांचे खूप हाल झाले होते. तसेच प्रशासक म्हणून मुख्याधिकारी हे पाणी पुरवठा विभाग व विद्युत विभाग याबाबत कुठलेही नियोजन करीत नाहीत. विशेष म्हणजे दि.३१ मार्च २०२१ पर्यंत वीज बिल एकही रुपया थकीत नसलेली नगरपरिषद म्हणून उस्मानाबाद नगरपरिषदेचा उल्लेख झालेला आहे परंतु शिंदे फडणवीस सरकार व मुख्याधिकारी यांच्या दिसाळ नियोजनामुळे दिवाळी हा सण हिंदू धर्मामध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या सणांमध्ये विज बिल न भरल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळामध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तसेच विज बिल न भरल्यामुळे शहरातील स्ट्रीट लाईट विद्युत पोल वरील लाईट कनेक्शन कट केल्यास शिंदे फडणवीस सरकारच्या काळात शहरातील नागरिकांना हिंदू धर्मातील दिवाळी हा सर्वात मोठा सण अंधारात साजरा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येत्या ८ दिवसांमध्ये शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने नगर परिषदेवर घागर व मशाल मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी मा.नगराध्यक्ष दत्ता बंडगर,शहरप्रमुख संजय मुंडे मा.गटनेते सोमनाथ गुरव, मा नगरसेवक राजाभाऊ पवार, रवी वाघमारे, गणेश खोचरे,अक्षय ढोबळे,बाळासाहेब काकडे, तुषार निंबाळकर, बंडू आदरकर, प्रदीप घोणे, रोहित निंबाळकर ,पंकज पाटील,सिद्धेश्वर कोळी, प्रशांत साळुंके,साबीर सय्यद, छोटा साजिद, मुजीब काझी, मनोज केजकर, सुनील गायकवाड, अक्षय माने,नाना घाडगे, बाबू पडवळ, मन्सूर काझी,रोहन गव्हाणे, प्रमोद पवार, दिनेश बंडगर, सुधीर अलकुंटे,महेश लिमये यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

From around the web