काँग्रेसपेक्षा शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते गबरगंड 

काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष खालील सय्यद यांचे जोरदार प्रत्युत्तर 
 
s

उस्मानाबाद - शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष  खालील सय्यद यांनी जोरदार पलटवार केला आहे. शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते कामे करून गबरगंड झाले तर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काम घेऊन गेले तर त्यांचे कामही करत नाहीत , अशी खंत व्यक्त करीत नियोजन समितीचा पाचशे कोटींचा निधी गेला कुठे ?  असा सवाल केला आहे. 

शिवसनेच्या सोलापूर येथे झालेल्या मेळाव्यात शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत  यांची खदखद बाहेर आली . मविआमध्ये शिवसेनेला दुय्यम स्थान मिळत आहे. राष्ट्रवादीचा साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा थेट मंत्रालयातून कोट कोट रुपयाची काम मंजूर करून आणतोय आणि आपला कार्यकर्ता दहा रुपयाची शिवभोजन थाळी वाटतोय , काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्याकडे बघून हसतात. हा अपमान किती दिवस सहन करायचा ? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी योग्य निर्णय घ्यावा असे म्हटले होते. 

त्यावर काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष खालील सय्यद  यांनी शिवसेनेवर आगपाखड केली आहे. खलील सय्यद म्हणाले, गेली दोन वर्षे जिल्हा नियोजन समितीचा पाचशे कोटींचा निधी गेला कुठे ? महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार 60℅ शिव सेना 20℅ राष्ट्रवादी काँग्रेस 20℅ कॉंग्रेस परंतु फक्त आणी फक्त शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते गबर गंड झाले कामे करून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काम घेऊन गेले तर त्यांचे काम ही करत नाहीत काम सुचवले मंजूर झाले तर ते काम त्या ठिकाणच्या सेनेच्या कार्यकर्त्याला दिले जाते सेनेत प्रवेश केला तरच काम देण्याचा विचार करू असे सांगतात ज्यानी प्रवेश केला त्यांची काय अवस्था आहे ते सगळेच पाहतोय

शिवसेनेत गेलेल्या सगळ्याच नेत्यांचे गोत्र कुळ मूळ काँग्रेसचे आहे पण सेनेत जाताच कॉंग्रेस संपवायला निघाले आहेत ,जिल्हा परिषदेत स्वबळावर काँग्रेसची सत्ता स्थापन होती सेनेचे केवळ पाच सदस्य होते तरीही शिव सेनेला सत्तेत सहभागी करून घेतले धनंजय सावंत बांधकाम सभापती झाले सगळी कामे सेने वाल्याना देत होते काँग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ओळख सुद्धा देत नव्हते हे आम्ही विसरलेलो नाही तेव्हाच तो अवमान व आताचा दुर्लक्षित पणा आम्ही मुकाट सहन केला आहे करत आहोतआघाडी धर्म पळताना व टीका करताना आपल्या गिरेबान मध्ये झाकून बघितले पाहिजे

मौका सभी को मिलता है जनाब... तुमने बहोत मारा लेकीन आपुन ने कुछ नही बोला लेकीने आपुन भी एकच मारेगा लेकीन सॉलिड मारेगाकाँग्रेसचा कार्यकर्ता वक्त आनेपर दिखायग, असेही म्हटले आहे. 

s

 

From around the web