धाराशिव जिल्ह्यातील 49 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे (उध्दव  ठाकरे गट ) वर्चस्व

 
s

धाराशिव - दि. 18 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील 166 ग्रामपंचायतीपैकी 49 ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवत शिवसेनेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे) निर्विवाद वर्चस्व स्थापन केले.

 स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख  उध्दवजी ठाकरे हेब तसेच युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत जिल्हाभरातील 49 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा (उध्दव बाळासाहेब ठाकरे)  भगवा फडकावला आहे. त्यापैकी धाराशिव तालुक्यातील 18, तुळजापूर 13, कळंब 11, लोहारा 3, उमरगा 2, वाशी 1 व भूम येथे 1 अशा ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे.

त्याचबरोबर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी व इतर घटक पक्षांसोबत आघाडी करुन महाविकास आघाडीचे धाराशिव 11, कळंब 9, लोहारा 2, उमरगा 6, तुळजापूर 08, वाशी 1, भूम 1, अशा 38 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडी मिळुन धाराशिव जिल्ह्यातील एकुण 87 ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्तापित केले आहे. 

भाजपला  अभूतपूर्व व ऐतिहासिक यश - आ. राणा जगजितसिंह 

जिल्हयात झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व व ऐतिहासिक यश मिळाले असुन सर्वांधिक गावामध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित सरपंच निवडून आले आहेत. पंतप्रधान .नरेंद्रजी मोदी  व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर जिल्हयातील जनतेने मोठा विश्वास ठेवला आहे. 

शिंदे-फडणवीस सरकारने अल्पवधीतच घेतलेले मोठे निर्णय व सर्व सामान्यांना होत असलेली मदत या निकालातून प्रतिबींबीत होते. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प व सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी मंजुर करण्यात आलेला निधी त्याचप्रमाणे अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी देण्यात आलेले अनुदान, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना  प्रोत्साहनपर अनुदान या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत झाली आहे. 

आजच्या निकालाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी अधिकच वाढली असून जिल्हावासियांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आगामी काळात तुळजापूर तिर्थक्षेत्राच्या विकासासह जिल्हयात मोठे प्रकल्प आणुन अर्थकारणाला बळकटी देण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न राहील व यासाठी शिंदे फडणवीस सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे असा विश्वास देतो, असे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. 

       

From around the web