राज्यपाल कोश्यारी यांच्या नादाला न लागणे बरे - शरद पवार 

 
s

उस्मानाबाद  - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते. एका जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज व सावत्री बाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.

राज्यपाल यांनी काही भाषण केलं. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वक्तव्य केलं. त्यांच्याबद्दल बोलण्यात काहीही अर्थ नाही. मुळात पद आणि अधिकार याचे तारतम्य राहत नसल्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य केली' असं पवार म्हणाले. 

राज्यपालांनी अशी वक्तव्यं केल्यानंतर कोण तुम्हाला विचारणार आहे, लोक म्हणतात यांच्या नादाला न लागणे बरे' असा टोलाही पवारांनी राज्यपाल कोश्यारी यांना लगावला.

तसंच, 'काही लोकांना सत्ता गेल्यापासून करमत नाही निवडणूक निकाल लागण्याआधीच मी येणार मी येणार, असे सांगत होते पण त्यांना आम्ही काय येऊ देतो, अशी मिस्कील टीका पवार यांनी हातवारे करत विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांच्यावर केली.

कोणी तरी म्हटलं की, आता माझं वय ८२ झालं आहे. पण मला अजून खुप करायचं आहे. जनतेनी साथ दिली तर हा गाडा चालत राहिल' असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार असेही पवार म्हणाले. 

५२ वर्षात तुम्ही मला भरपुर दिलं आहे.  ४ वेळा मुख्यमंत्री केलं . कोणी ४ वेळा मुख्यमंत्री होतं का? केंद्रात मंत्री आमदार-खासदार असे सलग ५२ वर्षे तुम्ही मला निवडून दिलं. आता काही नको आता पुढील पिढीसाठी काम करायचं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याने मला ४० वर्षे साथ दिली आणि आजही देत आहे. जे गेले ते गेले त्यांचा विचार नाही करायचा, असं म्हणत उस्मानाबाद जिल्ह्याची मुख्य समस्या पाणी आहे. मी आल्यानंतर व्यासपीठावरुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना बोललो आहे. पुढील ३ आठवडयात दोन धरणांची निविदा निघणार आहे.असेही पवार यांनी सांगितले. 

From around the web