येडशी येथे पिकविमा, अनुदानासाठी राष्ट्रवादीचा चक्काजाम
उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी येथे सततच्या पावसाने नुकसानीपोटी 222 कोटी व 2022 चा खरीप पिकविमा 250 कोटी विमा कंपनीकडून मिळावा, टेंभूर्णी-लातूर चौपदरीकरण रस्त्याचे काम चालु करावे , कै. गोपीनाथ मुंडे अपघात विमा मंजूर करण्यात यावा, या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.22) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तब्बल एकतास हा रस्ता रोखल्यामुळे वाहतूक कोंडी होवून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या सततच्या पावसाचे अनुदान 222 कोटी रुपये घोषणा करून महिना होऊन गेला. परंतु अद्यापही शेतकर्यांच्या नावावर अनुदानाची रक्कम प्राप्त झालेली नाही. त्याचप्रमाणे सन 2022 च्या खरीप पिक विमा रक्कम 250 कोटी पिक विमा कंपनीकडून येणे असताना जिल्ह्यातील शेतकर्यांना 254 कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. विमा कंपनीकडे पाच लाख 88 हजार शेतकर्यांनी पूर्व सूचना देऊनही दीड लाख शेतकर्यांच्या पूर्व सूचना पिक विमा कंपनीने फेटाळल्या आहेत. त्याचप्रमाणे वस्तूस्थिती पडताळणीसाठी पाठवलेल्या शेतकर्यांचे पंचनामे चुकीचे केलेले आहेत. ते पंचनामे व्यवस्थित करून जिल्ह्यातील व सूचना देणार्या शेतकर्यांना सरसकट मिळण्यासाठी वेळोवेळी कृषी मंत्री जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊनही काही उपयोग न झाल्यामुळे शेतकर्यांना नाईलाजास्तव येडशी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी प्रा.ओमन, प्रमोद वीर, अॅड. प्रविण शिंदे, भारत शिंदे, अरुण पवार, सागर चिंचकर, बालाजी डोंगे, इकबाल पटेल, रमेश गादेकर, तेजस भालेराव, मुश्रीफ मुजावर, शंकर कांबळे, गणेश गडकर, औदुंबर धोंगडे, विठ्ठल कोकाटे, संतोष पवार, अशोक पवार, संतोष खुने, संजय टेळे, सुखदेव राखुंडे, मारुती गवळी, सुनिल पवार, चंदु पाटील, गोरख चव्हाण, योगीराज पांचाळ, नंदकुमार पवार, आकाश जाधव, नाना माळी, दिपक माळी, बाळासाहेब केसरे, अमोल कोळी, वाहेद मुलाणी, जावेद सय्यद, सचिन शेळके, पिंटु शेळके, पप्पु पाटील, छावाचे शशिकांत पाटील, बाबुराव तवले, नाना नलावडे, अमोल हाजगुडे, अशोक बिरंजे, बप्पा डोके, राजेंद्र कोकाटे, भजनदास धोंगडे, बालाजी वाघमारे, रितेश कोल्हे, सुधाकर पवार, कबीर नागटिळक, अभिमन्यू पवार, सुरेश टेळे, भैय्या घुले, अमीर सय्यद, टिंगरे, रुपेश पवार, अमर केसरे, श्रीधर धाबेकर, काका कसबे, महादेव धाबेकर, बाळासाहेब पाटील, भास्कर काटे, अनिल काटे, कुंभार, ओम धाबेकर आदी शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.