उस्मानाबाद जि. म.  बँक निवडणूक :  पाच जागा बिनविरोध :  १० दहा जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात

 
s

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत १५ पैकी ५ जागा बिनविरोध निघाल्या असून, उर्वरीत १० जागेसाठी २२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. बिनविरोध आलेले उमेदवार महाविकास आघाडीचे असून,  या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. 

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध काढण्याचे प्रयत्न असफल झाले असून, त्याचे खापर शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर तर भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर फोडले आहे. 

या निवडणुकीत १५ जागासाठी १२१ उमेदवारांनी १६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये ९० उमेदवारी अर्ज मंजूर झाले होते. पैकी शेवटच्या दिवशी  ६३ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत,  २७ अर्ज  शिल्लक असून, पाच उमेदवार बिनविरोध निवडणूक आले आहेत. उर्वरित १० दहा जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. 

या निडवणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र आले असून, बिनविरोध आलेले उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील एकाकी लढत देत आहेत. उर्वरित १० जगासाठी आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. 

महाविकास आघाडीचे खालील प्रमाणे उमेदवार बिनविरोध विजयी  


1 )बापुराव माधवराव पाटील-
 उमरगा वि.का. - (कॉग्रेस)


2) सुनिल मधुकरराव चव्हाण
 -तुळजापुर वि.का. (कॉग्रेस)


3) मधुकर सुखदेव मोटे-
-भूम वि.का. (राष्ट्रवादी कॉग्रेस)


4) ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील
 -परंडा वि.का. (शिवसेना)


5) विक्रम उत्तम सावंत -
-वाशी वि.का. (शिवसेना)

भारतीय जनता पार्टी प्रणित पॅनल चे अधिकृत उमेदवार

 

.क्र.

उमेदवाराचेनाव

मतदारसंघ

कदम (पाटीलचंद्रकांत आनंतराव

वि.का.उस्मानाबाद

सावंत श्रावन अर्जुनराव

वि.का.कळंब

पाटील राहूल काकासाहेब

वि.का.लोहारा

दंडनाईक सतीश सत्यनारायण

इतर शेती संस्था

पाटील सुधीर केशवराव

नागरी बँक / पतसंस्था

टेकाळे उषा उत्तमराव

महिला प्रतिनिधी

कोळगे सुवर्णा राजाराम

महिला प्रतिनिधी

शिंदे कैलास चिंतामणराव

अनुसुचित जाती / जमाती

शिंगाडे विजय सुधाकर

इतर मागास प्रवर्ग

१०

मुंडे वैभव उमाकांत

वि.जा./../वि.मा.प्र.

सभासदांना निवडणुकीत लोटणाऱ्यांना मतदार बँकेतून बाहेर लोटेल - भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी आ.राणाजगजितसिंहजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन महिन्यापासून आज अगदी शेवटच्या घटके पर्यंत प्रयत्न केले. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना नात्या-गोत्याचे राजकारण करायचे आहे. कोणाला पै पाहुण्यांना निवडून आणायचे आहे, असा आरोप  भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला आहे. 


जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असताना महाविकास आघाडी च्या नेत्यांनी बँकेच्या सभासदांवर निवडणूक लादली आहे. सर्वसामान्य सभासदांचे हित जोपासले जाणे गरजेचे असताना काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थापोटी सभासदांवर निवडणूक लादली आहे.

बँकेचा मतदार हुशार असून ज्यांनी त्यांना निवडणुकीत लोटलं, त्या नेत्यांना बँकेतून बाहेर लोटल्या शिवाय राहणार नाही.

आमदार राणाजगजितसिंह पाटील व आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकतीने ही निवडणूक लढवेल व निश्चितच जिंकून दाखवेल असा विश्‍वास भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी व्यक्त केला आहे.
 

 

From around the web