जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ उस्मानाबादेत  राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

 
s

उस्मानाबाद - सत्य बाजू मांडणार्‍या विरोधी पक्षाची मुस्कटदाबी करुन लोकशाहीचा खून करणार्‍या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि.23) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जोरदार आंदोलन करुन राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

विधानसभेच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात दडपशाहीचे राजकारण करणार्‍या राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला. दिल्लीचे मिंधे फडणवीस-शिंदे, पन्नास खोके - एकदम ओके अशा घोषणा कार्यकर्त्यानी दिल्या. तर उपस्थित पदाधिकार्‍यांनी दडपशाहीचे राजकारण करणार्‍या शिंदे-फडणवीस सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला.

 आंदोलनात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे,  जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, संजय निंबाळकर, युवा नेते प्रतापसिंह पाटील, प्रदेश सचिव मसूद शेख, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, जि.प. माजी गटनेते महेंद्र धूरगुडे, नंदकुमार गवारे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश एकंडे, वाजिद पठाण, कादरखान अली खान, कुणाल निंबाळकर, शहराध्यक्ष अयाज शेख, उपाध्यक्ष  अनिकेत पाटील, माजी नगरसेवक बाबा मुजावर, मृत्यूंजय बनसोडे, खलिफा कुरेशी, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, युवती कार्याध्यक्ष श्वेता दुरुगकर, जिल्हा सहचिटणीस संतोष पवार,  सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष असदखान पठाण, युवक प्रदेश सचिव मझहर शेरीकर, तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख, उस्मानाबाद-कळंब विधानसभा अध्यक्ष अब्दुल सईद काजी, युवक शहराध्यक्ष सौरभ देशमुख, लीगल सेल शहराध्यक्ष  योगेश सोंन्ने पाटील, ज्योतीताई माळाळे,  तालुका संघटक  विवेक साळवे, दत्तात्रय पवार, बलभीम गरड, शेखर घोडके, रणवीर इंगळे, मिनिल काकडे, पंकज भोसले, प्रमोद वीर, वैभव मोरे, महेश सुरवसे, प्रज्ञावंत ओव्हाळ, शारेख, आवेज मोमीन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

From around the web