नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या आरक्षणाची 13 जून रोजी सोडत

 
d

उस्मानाबाद - राज्य निवडणुक आयोगाने दि. 9 जून 2022 नुसार उस्मानाबाद जिल्हयातील मुदत  समाप्त  झालेल्या उस्मानाबाद,तुळजापूर, नळदुर्ग,उमरगा, मुरुम, कळंब, भूम व परंडा  नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यासाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला) संबंधित तहसील कार्यालयात  व नगरपरिषद कार्यालयात संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली दिनांक  13 जून 2022 रोजी  दु.12.00 पासून सभा आयोजित करण्यात येणार आहेत.

बुधवार दि.15 जून रोजी आरक्षणाची अधिसूचना (कलम 10) नुसार रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविण्याकरिता वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येतील.तसेच बुधवार दि.15 जून ते मंगळवार दि.21 जून, आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी असेल. या कालावधीत हरकती व सूचना फक्त संबंधित नगरपरिषद कार्यालयात कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत स्वीकारल्या जातील. शुक्रवार दि.24. जून रोजी आरक्षण व सोडतीचा अहवाल संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांचेकडे पाठविण्यात येईल.

 जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चीत केला आहे.त्यानुसार आदेश निर्गमीत केले आहेत.असे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास शाखेचे जिल्हा सह आयुक्त सतीश शिवणे यांनी कळविले आहे.

From around the web