गद्दार आमदार चौगुले यांच्या प्रतिमेस हाणले जोडे

 
s

उमरगा - शिवसेनेचे गद्दार आमदार  ज्ञानराज चौगुले यांच्या निषेधार्थ उमरगा तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांनी उमरगा येथे निषेध रॅली काढून आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आमदार चौगुले यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी किल्लारी साखर कारखान्याचे चेअरमन बाबा पाटील, माजी तालुकाप्रमुख सुरेश वाले यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. रॅलीत संतप्त शिवसैनिकांनी गद्दार आमदार चौगुले यांच्या प्रतिमेला जोडे हाणून तीव्र निषेध व्यक्त केला.

शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे .आदित्यजी ठाकरे यांचा जयघोष करत उमरगा शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गावरुन  स्व.बाळासाहेब ठाकरे चौकापर्यंत ही  निषेध रॅली काढण्यात आली.

sd

यावेळी मार्गदर्शन करताना शिवसैनिकांनी किल्लारी साखर कारखान्याचे चेअरमन बाबा पाटील, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुरेश वाले यांनी आमदार चौगुले यांचा निषेध केला. त्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी आमदार चौगुले गद्दार असल्याच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

या रॅलीमध्ये विष्णू पाटील, माधव सूर्यवंशी, संतोष कलशेट्टी, सुनील पाटील, शिवाजी मदने, रणजित सास्तुरे, दादा चौधरी, विनोद पवार, शैलेश पवार, योगेश भोळे, दीपक चव्हाण, स्वप्नील वाले, शांतू म्हेत्रे, विजय फडताळे,विष्णु शिंदे,चंदर पाटील, ज्ञानराज चव्हाण, बाळू काळे,आबासाहेब चौधरी, मनोज जमादार, मनोज मोरे,गणेश मुगळे, श्रीकर बिराजदार, विठ्ठल पवार, आदीसह तालुक्यातील शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

From around the web