सतीश सोमाणी यांना बोलण्याच्या नैतिक अधिकार तरी आहे का - नायकल
उस्मानाबाद - रेशनचा काळाबाजार करून गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरवणाऱ्या सतीश सोमाणी यांना बोलण्याच्या नैतिक अधिकार तरी आहे का ? असा पलटवार भाजपाचे तालुका सरचिटणीस (संघटन) नामदेव नायकल केला आहे.
भापजाच्या वतीने काल दि. 05/06/2022 रोजी जिल्हायातील सत्ताधारी लोक प्रतिनिधीनी कार्यकारी अभियंत्यावर दबाव टाकून 1 कोटी पेक्षा जास्त रक्कमेची कामे एकाच मजुर संस्थेला देण्यासाठी शिफारस पत्रासह काम वाटप समिती कडे पाठवली होती. या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.
या निवेदण्याच्या अनुषंगाने शिवसेना तालुका प्रमुख सतिश सोमानी यांनी आज एक निवेदन दिले आहे त्याला प्रत्युत्तर देताना भाजपाचे तालुका सरचिटणीस (संघटन) नामदेव नायकल यांनी असे म्हटले की, रेशनचा काळाबाजार करून गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरवणाऱ्या सतीश सोमाणी यांना बोलण्याच्या नैतिक अधिकार तरी आहे का ? हिम्मत असेल तर आमच्या नेत्याचे नाव घेणा-याचे नाव सांगावे, दुध का दुध पाणी का पाणी होईल सत्यपडताळीसाठी नार्को चाचणी तर आहेच. काम वाटप समितीचे अध्यक्ष हे जिल्हा उप निबंधक असतात, व सदस्य पदी एक शासकीय अधिकारी व जिल्हा मजुर संघाचे चेअरमन असतात.
सोमाणीनी अनेक कामे केलेली आहेत. त्यांचा दैनदिन व्यवहार येथेच असतो. त्यामुळे ते याबाबत चांगल्याप्रकारे परिचीत आहेत. प्रत्येक कामात जसे की आमदार निधी , खासदार निधी, जनसुविधा यासारख्या योजनेतील कामांची दलाली खाणाऱ्यांना जनसेवा काय कळणार ?. पारधी पिढीवर राहणारी माणसं नाहीत का? त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे पाप आहे का? आणि हो आम्ही समाजातील सर्व घटकांपर्यंत जातो, त्यांची कामे करतो, सेवा करतो.
गुत्तेदारी आणि टक्केवारी च्या माध्यमातून केला जात असलेला भ्रष्टाचार आता तर कुठे जनते समोर मांडण्यास सुरुवात केली आहे. आम्ही तर केवळ चौकशीची मागणी केली आहे, मग तुम्हालाच एवढ्या मिरच्या का झोंबतायेत ? की यातही तुमचा वाटा आहे. आम्ही तर कोणाचे नाव घेतले नव्हते, मात्र तरीही सत्य जनतेसमोर आलेच. शिवसेनेच्या “अर्थक्षम” नेत्यांचे पवनचक्की मधील व्यवहारांचे कर्तृत्व आणखी जनतेसमोर मांडायचे आहे. ये तो बस ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है !सोमाणी यांनी इतर सर्व वायचळ गप्पा तर मारल्या, मात्र १ कोटीच्या कामाबद्दल काही भ्र शब्द बोलत नाहीत. की सोमनींनाच त्यांच्या संबधीतांनी ते कामांची शिफारसपत्र आणायला पाठविले होते, अशी शंका निर्माण होत आहे, असेही नामदेव नायकल यांनी म्हटले आहे.