खोटा नवाब राजीनामा दो ... 

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी उस्मानाबादेत भाजपाची निदर्शने
 
s

उस्मानाबाद  - खोटा नवाब राजीनामा दो , म्हणत भाजपच्या कार्य्ककर्त्यानी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

अटकेत असतांनाही राजीनामा न देणाऱ्या व अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नेत्यांना पाठीशी घालणाऱ्या म.वि.आ.सरकारच्या विरोधात तसेच नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले, १९९३ बॉम्बस्फोटातील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली वाहत आंदोलनाची सुरुवात करण्यात आली, तसेच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली.

याप्रसंगी नितीन काळे यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले की,  कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने १९९३ बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी अटक केली. कोर्टाने त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी दिली. अनिल देशमुखांचा राजीनामा ताबडतोब घेणारे शरद पवार, नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांची जनता हे सहन करणार नाही.हा राष्ट्राच्या सुरक्षेचा विषय आहे, राष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा होईपर्यंत निदर्शने करण्यात येतील,  गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार आता जास्त काळ टिकणार नाही. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता तात्काळ त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी काळात आंदोलने आणखी तीव्र करण्यात येतील असेही नितीन काळे यांनी सांगितले.

sd

या आंदोलनात भाजपचे दत्ताभाऊ कुलकर्णी, ॲड. मिलिंद पाटील, ॲड.खंडेराव चौरे, ॲड. अनिल काळे, ॲड. सतिश दंडनाइक, ॲड. नितीन भोसले, राजसिंह राजेनिंबाळकर, रामदास कोळगे, विजय शिंगाडे, प्रवीण सिरसाठे, इंद्रजित देवकाते, पांडुरंग लाटे, गुलचंद व्यवहारे, विनायक कुलकर्णी, राहुल काकडे, दाजीप्पा पवार, बालाजी कोरे, ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले, शेषराव उंबरे, प्रेम पवार, वैभव हांचाटे, विनोद निंबाळकर, अमोलराजे निंबाळकर, राहुल शिंदे, आनंद भालेराव, संदीप इंगळे, मेसा जानराव, गणेश मोरे, नरेंद्र वाघमारे, गिरीष पानसरे, अजय यादव, पंकज जाधव, सुनिल पांगुडवले, सागर दंडणाईक, विशाल चव्हाण, प्रसाद मुंडे यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थीत होते.

From around the web