राष्ट्रवादी महिला काँग्रेसमधील वाद थांबता थांबेना !

जिंकायला धाडस लागतं तर हरायला ताकद...!
 
s
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या ‘त्या’ डिजिटल फलकाची जिल्हाभर चर्चा

उस्मानाबाद - राष्ट्रवादी महिला  काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी मनीषा  राखुंडे - पाटील यांची नियुक्ती होताच , मावळत्या जिल्हाध्यक्ष ॲड. मंजूषा मगर-माडजे  यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. ही  नियुक्ती परस्पर , विश्वासात न घेता करण्यात आल्याने  राष्ट्रवादी महिला काँग्रेसमधील २० पदाधिकारी आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे देणार असल्याची माहिती ॲड.मगर-माडजे व सुरेखा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. 

त्यानंतर या महिला पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने बारामती येथे आज (दि.19) सकाळी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. शिष्टमंडळासमवेत चर्चा करताना खासदार पवार यांनी महिला पदाधिकार्‍यांनी पूर्ववत पक्षात कार्यरत रहावे असे सांगून निष्ठावंतांना कदापि डाववले जाणार नाही, अशी ग्वाही दिल्याची माहिती अ‍ॅड.मंजुषा मगर व सुरेखा जाधव यांनी दिली होती,


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या भेटीनंतर उस्मानाबाद शहरात महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांचे जागोजागी डिजिटल फ्लेक्स झळकू लागले असून यशाच्या प्रदर्शनामध्ये एक प्रतिमा संघर्षाची ही.....  जिंकायला धाडस लागतं तर हरायला ताकद... अशा अर्थपूर्ण ओळी त्यावर आहेत. 

हे  डिजिटल फ्लेक्स प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे - पाटील आणि निरीक्षक ऍड. प्रज्ञा खोसरे यांना खिजवण्यासाठी लावण्यात आले असून , यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसमधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या वादात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. 

From around the web