महागाईला लगाम घातल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही - बसवराज पाटील

जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या भाजपशासित केंद्र सरकारविरोधात काँगेसचे महागाईमुक्त भारत आंदोलन
 
xz
  • सरकारला जाग आणण्यासाठी टाळ मृदुंग, हलगी, ढोल ताशाचा गजर
  • महागाईमुक्त भारत आंदोलनात टाळ-मृदुंग, हलगी, ढोल आणि ताशाचा गजर करून सरकारला महागाईच्या विरोधात गजर करण्यात आला.

उमरगा -केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती स्वयंपाकाचा गॅसची बेसुमार दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या या सरकारने महागाई कमी केली ना बेरोजगार तरूणांना रोजगार. त्यामुळे काँग्रेस आता महागाईविरोधात रस्त्यावर उतरली आहे. महागाईला लगाम घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. महागाई कमी न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिला.

महागाईच्या वणव्यात सर्वसामान्य जनता होरपळली आहे. तरी देखील  भावनिक मुद्द्यांवर जनतेची दिशाभूल केंद्रातील भाजपा करून लूट करत आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील यांचा नेतृत्वाखाली उमरगा येथे आज (दि.1) आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना श्री. पाटील म्हणाले की,  त्यामुळे आज पेट्रोल डिझेलचे दर शंभरीपार गेले आहेत, स्वयंपाकाचा गॅस हजारावर गेला आहे. दुसरीकडे बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन दिलेल्या मोदी सरकारने किती तरुणांना आजवर नोकऱ्या दिल्या? असा सवाल करून प्रत्येक गोष्टीला केंद्र सरकारला फार मोठं अपयश आलेले असल्याचे ते म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील, महाराष्ट्र काॅग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, तालुकाध्यक्ष ॲड. सुभाष राजोळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, किल्लारी कारखान्याचे व्हा. चेअरमन विजयकुमार सोनवणे, विठ्ठलराव बदोले, नानाराव भोसले, विठ्ठलराव पाटील, मा.सभापती मदन पाटील,गोविंद पाटील, युवक काँग्रेस प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी, मा.नकराध्यक्षा सौ.प्रेमलता टोपगे,मा.नगरसेवक विक्रम मस्के,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश राठोड, मा.सभापती सचिन पाटील, विठ्ठलराव पाटील,मा.जि.प.सदस्य रफीक तांबोळी,धनराज हिरमुखे,महीला काँग्रेसच्या सौ.संगीता कडगंचे,संगीता पाटील,सुवर्णा भालेराव,तनया कडगंचे,विजय वाघमारे, नगरसेवक दिपक मुळे,ॲड. विरसंगप्पा आळंगे, धनराज हिरमुखे, एम. ओ. पाटील, रशीद शेख, दीपक मुळे, गौस शेख, याकुब लदाप,हरी लोखंडे, विक्रम मस्के,महेश माशाळकर,विजय वाघमारे,पप्पू सगर,प्रा.शोकत पटेल,राहुल वाघ,बबन बनसोडे,सुधीर चव्हाण,शिवाजी गायकवाड,परमेश्वर टोपगे,गणेश पाटील,आदीसह काॅग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

x

सिलेंडर, दुचाकीला घातला हार !
महागाईमुळे स्वयंपाकाचा गॅस आणि दुचाकी वाहन सर्वसामान्य जनतेला आता परवडणारे राहिले नाही. म्हणून इंधन दरवाढ कमी करण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गॅस सिलेंडर आणि दुचाकी वाहनाला पुष्पहार घालून मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

महागाईमुक्त भारत आंदोलनाच्या फलकाने वेधले लक्ष

 आंदोलनस्थळी महागाईचा भस्मासुर, पगार कपात - नोकरी जाण्याची भीती त्यात सतत पेट्रोल डिझेलची दरवाढ सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं? काय रे बाबा मोदी कसला रे तुझा खेळ स्वस्त झाले मरण आणि महागले पेट्रोल डिझेल यासारखे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

From around the web