अजित पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश 

 
a

उस्मानाबाद - राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष अजित पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी  भारतीय जनता पार्टीत  प्रवेश केला. तुळजापुर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुधाकर गुंड (गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख ‍उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालय, (प्रतिष्ठाण भवन) धाराशिव येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

या प्रसंगी नितीन काळे बोलत असतांना म्हणाले की सबका साथ सबका विश्वास सबका विकास या ध्येयवादाने पुढे चालणाऱ्या भाजपा पार्टीत आपणा सर्वांचे स्वागत. भारतीय जनता पक्ष हा कुण्या एका कुटुंबाचा पक्ष नसुन हा सर्व जातीधर्म समावेशक पक्ष असल्याचे ही नितीन काळे यांनी सांगीतले. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद व ग्राम पंचायत निवडणुकी मध्ये भारतीय जनता पार्टी पुर्णपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे ही नितीन काळे यांनी म्हटले.

या प्रवेश कार्यक्रमास भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.व्यंकटराव गुंड, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलेले रावसाहेग गुंड, भरत गुंड, मनोज गुंड, बाळासाहेब पवार, नानासाहेब अंबुरे, किरण खराडे, दादासाहेब शिराळ, अतुल जाधव, किरण गुंड, अनंत पवार, आप्पासाहेब काळे, विकास सोनटक्के, संभाजी गुंड, बालाजी खराडे, सहदेव ठाकरे, धनंजय पवार, हनुमंत चव्हाण, शाहुराज खराडे, कुंदन काळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यीनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

From around the web