टाकळीमध्ये नेमबाज पट्टू त्वरिता खटके हिचा सत्कार

 
as

पाडोळी-  उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें) येथे आज (दि.६) नेमबाज पट्टू त्वरिता सुर्यकांत खटके हिचा राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत निवड झाल्याबदल समस्त टाकळी(बेंबळी) ग्रामस्थाच्या वतीने  सत्कार करण्यात आला.

टाकळी(बेंबळी) येथील व सध्या सोलापूर येथील इंडीयन माॅडेल स्कूल मध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेली  त्वरीता सूर्यकांत खटके हिने नुकत्याच नवी मुंबई येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र एअर रायफल शूटिंग स्पर्धा(नेमबाजी स्पर्धा)  संपन्न झाल्या होत्या त्यात मुलींच्या तीनही गटात त्वरिता खटके हिने राज्यस्तरावर ३ सुवर्णपदके पटकवली होते. त्यानंतर  १३आॅक्टोंबर रोजी अहमदाबाद(गुजरात) येथे स्पर्धा संपन्न झाल्या होत्या. त्यात तीने महाराषट्राचे नेतृत्व केले होते. त्यात तिने पहिला क्रमांक पटकवला व राज्याचे नाव केले आहे. यानंतर २५नोव्हेंबर २१रोजी भोपाळ(मध्यप्रदेश)येथे राष्ट्रीय एअर रायफल शूटींग स्पर्धा संपन्न होणार आहेत त्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. त्यामुळे तिचा आज येथील महादेव मंदिर सभागृहात तिच्या संपूर्ण परिवाराचा शाल, श्रीफळ, फेटा हारतुरे अश्या स्वरूपात भव्य असा सत्कार करण्यात आला. 

त्वरीताने या स्पर्धेत नाव केल्याने समस्थ ग्रामस्थांना आनंद झाला. यावेळी माजी सरपंच काकासाहेब पाटील,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ सोनटक्के, शिव व्याख्याते विशाल सूर्यवंशी, आमोल डायरे,प्रा.राजा जगताप यांनी मनोगत व्यक्त केली.

 यावेळी रमेश(दादा)सूर्यवंशी, भारतभाऊ सोनटक्के,पीरसाब शेख,श्रीमंत(आण्णा)खटके,नीलम  खटके, उपसरपंच महादेव सूर्यवंशी, तानाजी(बापु)गायकवाड  बाबू लातूरे, उपस्थित होते.यावेळी सत्कारमुर्ती त्वरीता खटके मनोगत व्यक्त करतांना म्हणाली की,मला लहानपणापासूनच रायफल चालवण्याचा छंद होता.याञेत,व मेळाव्यात रायफलने फुगे फोडायचे आई वडिलांनी मला सरावासाठी तीन लाख किंमत असणारी रायफल घेऊन दिली, त्यामुळे मी नियमित सराव करते आपल्या ग्रामस्थाकडून खुप शुभेच्छा मिळाल्या भविष्यात मी ऑलम्पिक स्पर्धेत निश्चितच प्रयत्न करणार आहे.

अध्यक्षीय समारोप सूर्यकांत खटके(उल्हासनगर महानगरपालीका लेखाधिकारी) यांनी केला.सूञसंचालन सूर्यजी तानाजी गायकवाड यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

From around the web