वाशी तालुक्यातील दोनजण हद्दपार 
 

 
वाशी तालुक्यातील दोनजण हद्दपार

कळंब - वाशी तालुक्यातील दोन जणांना उस्मानाबाद जिल्ह्यातून  हद्दपार करण्याचा  आदेश उपविभागीय अधिकारी आहिल्या गाठाळ यांनी काढला आहे.  नाना शिवाजी घुले आणि बन्सी   तात्या थोरबोले अशी त्यांची नावे आहेत. 


वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील नाना शिवाजी घुले यांच्यावर येरमाळा पोलीस ठाण्यात अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.नाना घुले यांना प्रशासनाने वारंवार समजून सांगून वेळोवेळी योग्य सूचना देऊन त्यांच्या वर्तुणुकीत बदल होत नसल्याने पोलीस प्रशासनाने अटक करुन देखील सुधारणा झाली नाही.घुले यांच्यावर शरीर विरुद्ध,मालमत्ता विरुद्ध, परिसरात दहशद निर्माण करणे, शुल्लक कारणावरुन हानमार करणे, अशा वृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक राहावा यासाठी कळंब चे उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश काढले आहेत 

वाशी तालुक्यातीलच  बन्सी तात्या थोरबोले हा गोजवडा येथील रहिवाशी आहे.गावातील नागरिकांना शुल्लक शिवीगाळ करणे,शेतात जाणाऱ्या महिलांची छेड काढणे,दारु विकणे,विनयभंग करणे,या गोष्टीमुळे व कायद्याचा धाक राहावा यासाठी कळंब चे उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश काढले आहेत .

From around the web