देवसिंगा तूळ : अतिवृष्टीमुळे घर वाहून गेलेल्या निराधारअंध दांपत्याला खा. ओमराजे यांचा मदतीचा हात

 
 देवसिंगा तूळ : अतिवृष्टीमुळे घर वाहून गेलेल्या निराधारअंध दांपत्याला खा. ओमराजे यांचा मदतीचा हात


तुळजापूर -  तीन-चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक व वित्त हानी झालेली आहे. याचा मोठ्या प्रमाणावर फटका लोकांना बसला आहे. देवसिंगा तूळ, ता. तुळजापूर येथे अर्जुन शिवाजी मस्के व त्याच्या पत्नी हे एक निराधार अंध दाम्पत्य राहत होते. या अतिवृष्टीमध्ये या दाम्पत्याचे घर हे वाहून गेले होते. अशा निराधार दाम्पत्यावर असे संकट कोसळले असता, उस्मानाबादचे खा. ओमराजे निंबाळकर यांनी अतिवृष्टी पाहणी दौर्यावर असताना या कुटुंबियांची भेट घेऊन त्याला आधार दिला होता. यामध्ये त्यांना लवकरात लवकर मदतीचे आश्वासन ओमराजे निंबाळकर यांनी दिले होते.


         आज रोजी  खासदार. ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या ' २० टक्के राजकारण व ८० टक्के  समाजकारण” तत्वांप्रमाणे त्या निराधार दाम्पत्याला उस्मानाबाद  शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी यांच्या हस्ते रोख 20 हजार  रुपये आर्थिक मदत करून मदतीचा एक छोटासा आधार देण्यात आला. 

          यावेळी तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी तुळजापूर उप तालुकाप्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण,उस्मानाबाद विभागप्रमुख सौदागर जगताप, सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर,अमिर शेख,सिदफळ सोशल मिडीया विभागप्रमुख सिद्राम कारभारी,काक्रंबा सोशल मिडीया विभागप्रमुख महादेव पवार यांच्यासह सर्व स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

From around the web