तुळजापूरातील सराईत गुंड माने एमपीडीए कायद्यान्वये तुरुंगात स्थानबध्द

 

तुळजापूरातील सराईत गुंड माने एमपीडीए कायद्यान्वये तुरुंगात स्थानबध्द



तुळजापूर -  तुळजापूरातील सराईत गुंड अभिषेक राजेंद्र उर्फ राजाभाऊ माने  एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द करण्यात आले असून त्याची रवानगी औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृह (हर्सुल )  येथे करण्यात आली आहे. 

अभिषेक राजेंद्र उर्फ राजाभाऊ  माने , रा. तुळजापूर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्याविरुध्द पो.ठा. तुळजापूर येथे मारहाण, बेकायदेशीर जमाव जमवणे, शस्त्राचा धाक दाखवणे इत्यादी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तुळजापूर शहरातील त्याच्या वास्तव्यामुळे कायदा व्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. त्याच्याविरुध्द प्रचलित कायद्या प्रमाणे कारवाई करुनही त्याच्या वर्तनात सुधारणा होण्या ऐवजी त्याच्या गुन्हेगारीचा आलेख वाढतच होता.

त्याच्या गुंडगीरीला आळा बसावा या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांनी अभिषेक माने याच्या विरुध्द एमपीडीए कायदा अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्याचे निर्देश उपविभागीय पोलीस अधिकारी- दिलीप टिपरसे व तुळजापूर पो.ठा. चे प्रभारी अधिकारी हर्षवर्धन गवळी यांना दिले. त्यास अनुसरून अभिषेक माने याच्याविरुध्द दाखल व न्यायप्रविष्ट असलेल्या गुन्ह्यांचे अभिलेख जोडून एमपीडीए कायदा अंतर्गत स्थानबध्दतेचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांना सादर करण्यात आला होता.

अभिषेक माने याला मोकळे ठेवणे समाज हितास अपायकारक असल्याची व त्याच्या वर्तनात सुधारना होणे गरजेचे असल्याच. जिल्हादंडाधिकारी यांना पोलीस प्रशासनाने युक्तीवाद करुन पटवून दिले. त्यास अनुसरुन मा. जिल्हादंडाधिकारी यांनी अभिषेक माने यास एमपीडीए कायद्यानुसार कारागृहात स्थानबध्द करण्याचा आदेश दि. 29.07.2020 रोजी जाहीर केला. त्यानुसार तुळजापूर पोलीसांनी काल दि. 30.07.2020 रोजी अभिषेक माने यास ताब्यात घेउन त्याची रवानगी औरंगाबाद शहरातील ‘ मध्यवर्ती कारागृह- हर्सुल’ येथे केली आहे. हा प्रतिबंधात्मक स्थानबध्दता प्रस्ताव बनवण्यात तुळजापूर पो.ठा. च्या पोहेकॉ- अश्विनकुमार जाधव, पोना- चक्रधर पाटील, महिला पोकॉ- मनिषा शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

From around the web