जे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे,  ते काम बेंबळी पोलिसांनी स्वखर्चाने केले... 

 
जे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे, ते काम बेंबळी पोलिसांनी स्वखर्चाने केले...

पाडोळी - जे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे, ते काम बेंबळीच्या पोलिसांनी स्वखर्चाने करून सर्वाना चकित करून सोडले आहे. चिखली चौरस्त्यावर खचलेल्या ठिकाणी पांढऱ्या रंगाने पट्टे मारून वाहन धारकांना सतर्क केले आहे. 


उस्मानाबाद तालुक्यातील चिखली चौरस्त्यावरील एका ठिकाणी उस्मानाबाद-औसा रस्ता खचला असून या ठिकाणी मागील काही दिवसापासुन हा खचलेला रस्ता दिसत नसल्याने लहान लहान अपघात होत होते.  

     भविष्यात या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून वाहनधारकांना लांबूनच पुढे खड्डा आहे हे लक्षात येणेसाठी बेंबळी पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल पी.एम.आलूरे, पोलिस नाईक व्ही.आर.पेठे,  नाईक एस.एच.सदावर्ते,  पोलिस  नाईक एस.ए. ईगवे यांनी पुढे येत स्वखर्चाने रस्ता खचलेल्या ठिकाणी धोका दर्शविण्यासाठी पांढऱ्या रंगाने पट्टे मारून घेतले आणि वाहन धारकांना सतर्क केले आहे. 

सदर पोलिस अधिकारी (दि.१२) काल बेंबळी पोलिस ठाण्या अंतर्गत चिखली चौकात नाकाबंदी दरम्यान कर्तव्यावर होते, दरम्यान  हा खड्डा सोडला तर पूर्ण रस्ता चांगला असल्याने सर्व वाहने वेगात येऊन या ठिकाणी खड्डा दिसत नसल्याने आदळत होती, मोटारसायकल स्वार व्यक्तींना हा मोठा धोका होता आणि भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी या पोलिस अधिकाऱ्यांनी पुढे येत रस्ता खचलेल्या ठिकाणी धोका दर्शक पांढरे पट्टे ओढल्यामुळे त्यांचे परिसरातील गावात कौतुक होत आहे.

जे काम बांधकाम विभागाने कराचे ते काम पोलिस अधिकारी करत आहेत, त्यामुळे बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

From around the web