साखर कारखान्यामध्ये ऑक्सिजनची निर्मिती करणारा देशातील एकमेव धाराशिव कारखाना... 

 
साखर कारखान्यामध्ये ऑक्सिजनची निर्मिती करणारा देशातील एकमेव धाराशिव कारखाना...

उस्मानाबाद -  कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासू लागल्याने मागणी वाढली असून या ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मार्ग काढत खा.शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाला उस्फुर्त  प्रतिसाद देत धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरिंग पुणे यांच्या तांत्रिक सहाय्याने ऑक्सिजन निर्मिती करण्याचे धाडस दाखवून रात्र-दिवस काम सुरू ठेऊन अठरा दिवसातच प्रकल्पाचे काम पुर्ण केले आहे. या कारखान्यातून ऑक्सिजनची निर्मिती सुरू झाल्यामुळे तो देशातील पहिला व एकमेव साखर कारखाना ठरला आहे हे विशेष. 

ऑक्सीजन निर्मिती करण्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी यांच्यासह इतरांच्या सहकार्याने हा प्रकल्पा उभारणीसाठी मदतीचा हातभार लागला व लावल्यामुळेच हा प्रकल्प पुर्ण करण्यात आला. 

धाराशिव साखर कारखान्यात प्रत्यक्षात ऑक्सिजन निर्मितीस दि.१२ मे रोजी प्रारंभ झाला असून ऑक्सिजनची शुद्धता तपासणासाठी मुंबईच्या प्रयोग शाळेमधे तीन बबल पाठविण्यात आले असल्याची माहिती चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली. तसेच या कारखान्याने अगदी कमी कालावधीत ऑक्सिजन निर्मिती केल्यामुळे यि कारखान्याने साखर कारखानदारीत प्रेरणादायी वायुरुपी आर्दश निर्माण केला आहे. 

ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी या साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पात काही बदल करून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला पायलट प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यामध्ये ऑक्सिजनची शुद्धता ९६ टक्के आली असून शासन स्तरावर शुध्दता तपासणीसाठी ऑक्सिजनचे तीन बबल मुंबई येथील प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आल्याचे चेअरमन  पाटील यांनी सांगितले.


देशातील कारखानदारीत आदर्श उदाहरण

कोरोना विषाणूंच्या संकटापासून लोकांचे जीव वाचविण्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा कार्यान्वित करून ऑक्सिजनची निर्मिती केली. अशा पद्धतीने ऑक्सिजनची निर्मिती करणारे चेअरमन अभिजित पाटील हे‌सा कारखानदारीसाठी जीवन उपयोगी आदर्श ठरले आहेत.

From around the web