राज्यातील पहिला ऑक्सिजन निर्मिती पायलट प्रोजेक्ट धाराशिव साखर कारखान्यावर उभारणार

- चेअरमन अभिजित पाटील
 
राज्यातील पहिला ऑक्सिजन निर्मिती पायलट प्रोजेक्ट धाराशिव साखर कारखान्यावर उभारणार

उस्मानाबाद -  सर्वत्र कोरोना विषाणूच्या  संक्रमणामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आजारी पडून ऑक्सिजन अभावी दगावत आहेत. त्यामुळे हवेतील ऑक्सिजन तयार करणारा राज्यातील पहिला प्रायोगिक प्रकल्प कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखाना सुरू करणार असल्याची माहिती चेअरमन अभिजित पाटील यांनी दिली.

राज्यातील साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निमित्तीचा पायलट प्रोजेक्ट धाराशिव साखर कारखान्यावर वसंतदादा इन्स्टिट्यूट झुम मिटींगमध्ये करण्याचे निश्चित झाले आहे. 

पुढे बोलताना चेअरमन पाटील म्हणाले की, देशाचे नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार वसंतदादा इन्स्टिट्यूटने दि.२३ एप्रिल रोजी झूम मिटींगवुदारे राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मिटींग घेण्यात आली. त्यामध्ये धाराशिव शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील सहभागी झाले होते. 

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात  गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे.  त्यामुळे कोरोना रूग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली असून राज्यात दररोज हजारो रुग्ण कोरोना विषाणू मुळे बाधित झाले असल्याचे आढळत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा फार मोठा जाणवत आहे. तर या बैठकीवेळी व्हीएसआयकडून तातडीच्या उपाययोजना सांगण्यात आल्या. कारखान्यांकडे इथेनॉल प्रकल्प सुरु आहेत. अशा प्रकल्पामध्ये थोडाफार फेरफार करून अतिरिक्त सामग्रीत माॅलेक्युलर सिव्ह वापरून हवेतील वायुव्दारे ऑक्सिजनची निर्मीती मोठ्या प्रमाणात करण्याचा तपशील चेअरमन अभिजीत पाटील यांनी सविस्तर उपस्थितांना पटवून सांगितले. त्यामुळे या मिटींगमध्ये हा प्रकल्प तात्काळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 धाराशिव साखर कारखाना प्रति दिन १६ ते २० टन ऑक्सिजन निर्मिती करणार असल्याची माहिती चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली. वाढत्या ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेऊन या ऑक्सिजन निर्मितीचा राज्यातील पहिला पायलट प्रकल्प कार्यरत करीत आहेत. धाराशिव साखर कारखान्यास ऑक्सिजन निर्मिती तयारीस लागणारी परवानगी ना. जयंत पाटील यांनी त्वरित देण्याचे सांगून लवकर पायलट प्रकल्प कार्यरत करावा असे सांगितले. वसंतदादा इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरींगच्या टेक्निकलच्या माध्यमातून ही प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन पाटील यांनी दिली.

From around the web