कोरोनामुळे शाळा बंद पण कर्मचारी संस्था चालकाच्या शेतीच्या कामावर ( Video)

ऐन स्वातंत्र्यदिनी घाटंग्रीच्या संस्था चालकाची कर्मचाऱ्यांना गुलामाची वागणूक 
 
sd

उस्मानाबाद - कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून उस्मानाबादसह राज्यातील शाळा बंद आहेत, पण संस्था चालक कर्मचाऱ्यांना गुलामाची वागणूक देत असल्याचा धक्कादायक प्रकार घाटंग्री येथे उघडकीस आला आहे. एकीकडे देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव:साजरा होत असताना, घाटंग्रीच्या  शाळेतील कर्मचारी संस्था चालकाच्या शेतात दिवसभर उन्हातान्हात राब-राब राबत असल्याचा व्हिडिओ उस्मानाबाद लाइव्हच्या हाती लागला आहे. 

उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री येथे वसंतराव नाईक यांच्या नावे भटक्या विमुक्तांसाठी शाळा आणि वसतिगृह काढण्यात आले आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथे विद्याधन प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. गुलाबचंद जाधव हे संस्था चालक आहेत. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद असली तरी हा संस्था चालक कर्मचाऱ्यांची पिळवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. 

d

एकीकडे देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव:साजरा होत असताना,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शाळेतील कर्मचारी संस्था चालकाच्या शेतावर दिवसभर उन्हातान्हात राबराब राबत असल्याचा व्हिडिओ उस्मानाबाद लाइव्हच्या हाती लागला आहे.सर्व कर्मचारी संस्था चालकाच्या शेतात कांदा लागवड करीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. 

याप्रकरणी जिल्हाधिकारी, यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. संस्था चालक नेहमीच कर्मचाऱ्यांना गुलामाची वागणूक देत असून, नोकरी जाईल या  भीतीने कोणताही कर्मचारी पुढे येत नसल्याचे या तक्रारीमध्ये म्हटले आहे. 

संस्था चालक गुलाबचंद जाधव  याचे समाजकल्याण अधिकारी आणि समाज कल्याण आयुक्त यांच्या बरोबर साटेलोटे असल्याने कोणतीही कारवाई होत नाही. या शाळेत कोणातही गुणवत्ता जोपासली जात नाही. शासनाचे अनुदान लाटण्यासाठी केवळ शिक्षणाचा बाजार मांडण्यात आला आहे. याप्रकरणी आता काय कारवाई होणार ? याकडे लक्ष वेधले  आहे. 

पाहा व्हिडीओ 

From around the web